Fri, March 31, 2023

Sangli Crime : काँग्रेस नगरसेवकाची भरदिवसा हत्या; आधी गाडीवर गोळीबार, मग डोक्यात दगड घातला
Sangli Crime News: भाजपा नगरसेवकाची भरदिवसा हत्या; आधी गाडीवर गोळीबार, मग डोक्यात दगड घातला
Published on : 17 March 2023, 9:29 am
Sangli Crime News: सांगलीतल्या जतमध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. नगरसेवक विजय ताड यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. ताड यांच्या वाहनावर गोळीबार झाला असून नंतर डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे.
हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या मालमत्तेच्या वादावरुन झाली असू शकते. पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. आरोपी ज्या दिशेने गेले, त्या दिशेने तपास करण्यात येत आहे. आरोपींनी ताड यांच्या गाडीवर आधी गोळीबार केला आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली आहे.