Sangli Murder Case : राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या खूनप्रकरणाचा उलगडा; सांगली पोलिसांची मोठी कारवाई

Sangli Murder Case
Sangli Murder Caseesakal
Updated on

सांगलीः काल रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान सांगलीमध्ये एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती. यानंतर आरोपी पसार झाले होते. रात्री पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवल्यानंतर आज या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे.

काल शनिवारी रात्री आठच्या सुमारास माने चौक लगत असणाऱ्या परिसरात ही घटना घडल्याने सांगली पुन्हा हादरली. मोका टोळीतील कुख्यात गुन्हेगार आणि खासगी सावकार मुश्‍ताक मुल्ला याचा नालसाब मुल्ला हा भाऊ होता. मृत नालसाब याच्यावरही मोकातंर्गत कारवाई करण्यात आली होती. तो जामिनावर बाहेर होता. तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत होता.

Sangli Murder Case
Uddhav Thackeray : 'तुमचे बाप किती तुम्हालाच माहिती!' उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर जहरी टीका

याप्रकरणी आज पोलिसांनी चार आरोपी ताब्यात घेतले आहेत. तर 1 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. सचिन डोंगरे या मोक्कामध्ये जेलमध्ये असलेल्या गुन्हेगाराला जामीन न होऊ देण्यासाठी आणि त्याला बाहेर येता येऊ नये, यासाठी नालसाब मुल्ला प्रयत्न करत असल्याच्या कारणातून हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सनी कुरणे (वय २३), विशाल कोळपे (वय २०), स्वप्नील मलमे (वय २०) अशी तीन आरोपींची नावे आहेत. मुल्ला याच्या छातीवर व पोटावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. त्यांच्यासोबत आणखी दोघे असावेत असा संशय आहे.

Sangli Murder Case
Uddhav Thackeray : ''मोहनजी भागवत, तुम्ही तुमचं हिंदुत्व स्पष्ट करा'', उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले 'हे' मुद्दे

गोळीबाराचा आवाज ऐकून मुल्ला याच्या घरातील व परिसरातील नागरिक धावले. तेव्हा मुल्ला गंभीर अवस्थेत होता. त्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Hit by Heavy Rain and Hailstorm, Crops Damaged Across District
Sangli crime news
Bihar Laborer Killed
Rohit Mhaishale Case Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com