Uddhav Thackeray : ''मोहनजी भागवत, तुम्ही तुमचं हिंदुत्व स्पष्ट करा'', उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले 'हे' मुद्दे

uddhav thackeray on mohan bhagwat
uddhav thackeray on mohan bhagwat esakal
Updated on

मुंबईः शिवसेनेच्या वतीने आज मुंबईतल्या वरळीत शिबीराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये संजय राऊत यांनी ताडखेबाज भाषण केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी ठाकरेंनी थेट सरसंघचालक मोहन भागवत यांना उद्देशून प्रश्न उपस्थित केला.

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, एक जाहिरात आली, त्यामध्ये बापच बदलला गेला. सध्या राज्यात काय सुरुय ते सगळ्यांनाच कळतंय. फक्त बावन्नच काय, ५५२ कुळं बदलली तरी मुंबई कुणीही तोडू शकणार नाही. भलेही आम्ही काँग्रेससोबत गेलो असलो तरी आम्ही हिंदूच आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

uddhav thackeray on mohan bhagwat
Uddhav Thackeray : अमेरिकेत विकत घेतलेल्या लोकांसमोर ज्ञान पाजळणार, पण…; मणिपूर मुद्द्यावरून ठाकरे PM मोदींवर बरसले!

पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की, मोहनजी भागवत, तुम्ही तुमचं हिंदुत्व स्पष्ट कराच. तुम्ही मशिदीमध्ये जाता, तिकडे भाजप महेबुबा मुफ्ती यांच्यासोबत जातं, वारकऱ्यांवर हात उचलला जातो. त्यामुळे खरंतर तुम्ही तुमचं हिंदुत्व स्पष्ट करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

''समान नागरी कायदा काय आहे, हे एकदा स्पष्ट करा. हिंदुंनाच त्याचा त्रास होणार आहे. समान नागरी कायदा आणणार असाल तर राज्यकर्ते म्हणून सर्वांना समान न्याय द्या, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा 'समान' विचार आहे का?'' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

uddhav thackeray on mohan bhagwat
Adipurush FIR: आमच्या भावना दुखावल्या.. म्हणत आदिपुरुष विरोधात हिंदू महासभेने केला FIR दाखल

महाराष्ट्र माझं घर आहे- ठाकरे

मुख्यमंत्रीपदाच्या काळात उद्धव ठाकरे घरात बसले, असा आरोप केला जातो. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, नाही पडलो घराबाहेर. कारण महाराष्ट्र माझं घर आहे. घरात बसून मी महाराष्ट्र सांभाळला आहे. जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली तेव्हाचा मी साक्षीदार आहे. तुम्ही तेव्हा दुसऱ्या पक्षाच्या गोधडीत काहीतरी करत असाल.

''सर्वांनाच वाटलं हा काय करणार मुख्यमंत्री झाल्यावर. परंतु सगळ्यांनाच झोपवलं होतं मी. थोड्या अडचणी आल्या परंतु आज मी पुन्हा उभा राहिलो आहे. लोकांनी मला कुटुंबातील सदस्य मानलं आहे. तुम्ही कितीही खोके दिले तरी तुम्हाला लोक कुटुंबातील सदस्य मानणार नाहीत. कारण तिथेही तुम्ही कुटुंब फोडाल'' असं म्हणून ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.