Shivsena: वर्षा बंगल्यात झाला ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश, सांगितलं कारण..

ठाकरे गटाला आज आणखी एक धक्का बसणार असल्याचं सूचक ट्विट शिंदे गटाकडून करण्यात आलं होतं
Uddhav Thackrey
Uddhav Thackrey Esakal

एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदार आणि खासदार यांच्यासोबत शिवसेनेत बंड केलं आणि शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि समर्थक यांनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला गळती लागली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला आज आणखी एक धक्का बसणार असल्याचं सूचक ट्विट शिंदे गटाकडून करण्यात आलं होतं.(Latest Marathi News)

शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी हे ट्विट केलं होतं. आज 'उबाठा'चा आणखी एक मोहरा कमी होणार आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून तो खऱ्या विचारांशी निष्ठा राखणार आहे. खरा कार्यकर्ता हा कधीही ठाकरे गटासोबत राहू शकत नाही, अशा अशायाची एक कविता नरेश मस्के यांनी ट्विट केलं होतं.(Latest Marathi News)

Uddhav Thackrey
MPSC Student Attack: 'माझा काही दोष नसताना त्यानं मला मारलं...' पिडित तरुणी सांगितली आपबिती

तर शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्याचे नाव नरेश म्हस्के यांनी नाव जाहीर केलं नव्हतं. शिंदे गटात प्रवेश करमारा नेता अनिल परब यांच्या जवळचा आहे. संजय अगलदरे असं शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्याचं नाव आहे. संजय अगलदरे हे ३ वेळा नगरसेवक राहिले आहेत. एकदा वरळी तर २ वेळा खार दांडा येथून ते नगरसेवक झाले आहेत.(Latest Marathi News)

Uddhav Thackrey
Telangana Onion Rate: BRS नेत्यांच्या दाव्याची शेतकऱ्याकडून पोलखोल! कांदा लिलाव व दराची मांडली कैफियत

आज वर्षा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश केला आहे. तर अगलदरे यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर आपलं बाळासाहेबांच हिंदुत्वाचं सरकार स्थापन झाल्यानंतर थांबलेले विकासकामे सूरू झाली आहेत. आपलं सरकार आलं त्यानंतर त्यांना चांगल्या सेवा मिळाव्या यासाठी शिंदे सरकारने अनेक गोष्टी केल्या असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

Uddhav Thackrey
Devendra Fadnavis : माझं काम नाईट वॉचमनचं...; मोदी @९मध्ये फडणविसांची फटकेबाजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com