Sanjay Gaikwad
Sanjay Gaikwadesakal

Sanjay Gaikwad : लोकसभेसाठी अर्ज भरल्यानंतर संजय गायकवाडांना मुख्यमंत्र्यांचा फोन, म्हणाले...

Sanjay Gaikwad News : आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना डावलून संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला फोन केल्याचं आमदार गायकवाड यांनी सांगितलं.

Sanjay Gaikwad News : आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना डावलून संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला फोन केल्याचं आमदार गायकवाड यांनी सांगितलं.

शिवसेनेकडून उमेदवारांची नावं जाहीर झालेली नसताना संजय गायकवाड यांनी अर्ज का दाखल केला, असा प्रश्न उपस्थित होतोय. गायकवाड यांनी दोन अर्ज भरल्याची माहिती येतेय. एक अपक्ष आणि दुसरा पक्षाकडून. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

Sanjay Gaikwad
MVA Seats Sharing: मुंबईतल्या 6 जागांवरुन मविआत धुसफूस; काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीनंही केला 'इतक्या' जागांवर दावा

अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार गायकवाड म्हणाले की, मी लोकसभेसाठी अर्ज भरला त्याचं कारण आपणही लढलं पाहिजे, असं मला वाटत आहे. शिवाय कार्यकर्ते आणि जिल्हावासियांच्या त्याच भावना आहेत. अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचंही संजय गायकवाड म्हणाले.

अर्ज भरण्याचा आदेश मुंबईतून होता का? असा प्रश्न संजय गायकवाडांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, तसं काही नाही. तसा आदेश नव्हता. मी अर्ज भरल्यानंतर साहेबांचा मला फोन आला आणि अर्ज भरल्याबद्दल विचारलं. याबाबत एकनाथ शिंदे यांची संमती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय माघार घेण्याबाबत विचार केला नाही, असही संजय गायकवाड म्हणाले.

Sanjay Gaikwad
Share Market Closing: आर्थिक वर्षाच्या शेवटच्या सत्रात शेअर बाजारात विक्रमी वाढ; गुंतवणूकदार झाले मालामाल

शिवसेनेच्या उमेदवारांची यादी अजून जाहीर झालेली नाही. त्यापूर्वीच विजय शिवतारे, बच्चू कडू, आनंदराव अडसूळ यांच्या कुरबुरी सुरु आहेत. यातच आता बुलडाण्याच्या संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना हा स्वपक्षातून झटका समजला जातोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com