संजय पांडे यांचे महासंचालकपद जाणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dgp sanjay pandey
संजय पांडे यांचे महासंचालकपद जाणार?

संजय पांडे यांचे महासंचालकपद जाणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्राचे कार्यकारी पोलिस महासंचालक संजय पांडे या पदावर काम करण्यास लायक नसल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शिफारशीतून समोर आले आहे. प्रलंबित असलेल्या निर्णयावर आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने उत्तर दिले आहे.

लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या नावांतील अधिकाऱ्याची महासंचालकपदी निवड करायची असते. दिल्लीहून लोकसेवा आयोगाने महासंचालकपदासाठी रजनीश सेठ, डॉ.व्यंकटेशन आणि हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडयानुसार लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या नावांपैकीच एका अधिकाऱ्याची निवड करणे बंधनकारक असल्याने पांडे यांना पायउतार व्हावे लागेल. या संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे गृहविभागाने स्पष्ट केले आहे.

loading image
go to top