Shivsena : राठोडांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन; पोहरादेवीच्या महंतांना उतरवणार मैदानात?

Shivsena : राठोडांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन; पोहरादेवीच्या महंतांना उतरवणार मैदानात?

मुंबई : शिंदे गटातील मंत्री आमदार संजय राठोड यांना आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शह देण्यासाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी दंड थोपटले आहेत. बंजारा समाजातील पोहरादेवीच्या महंतांना शिवसेनेकडून निवडणुकीसाठी तिकीट देण्याची शक्यता आहे. लवकरच पोहरादेवी मंदिराचे महंत शिवबंधन बांधणार असल्याचीदेखील चर्चा सुरू आहे.

(Sanjay Rathod vs Uddhav Thackeray)

दरम्यान, यवतमाळचे आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे अनेक बंजारा समाजातील मतदारांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. शिंदे - फडणवीस सरकारने त्यांना मंत्रिपद दिल्यामुळे अनेक नेत्यांनी त्यांच्यावर आणि सरकारवर निशाणा साधला होता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते पण त्यांना कोर्टाने क्लीनचीट दिल्यामुळे ते या प्रकरणातून मुक्त झाले आहेत. पण राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना राठोडांविरोधात मैदानात उतरणार आहे.

Shivsena : राठोडांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन; पोहरादेवीच्या महंतांना उतरवणार मैदानात?
Monsoon Rain : धरणे, तळे फुल्ल! मान्सूनचा निरोप; परतीचा प्रवास सुरू

बंजारा समाजात पोहरादेवी हे मोठं दैवत असल्यामुळे तेथील मंदिरांच्या महंतांना शिवसेनेत घेण्याचा उद्धव ठाकरे यांचा विचार असल्याची चर्चा सुरू आहे. लवकरच महंत शिवबंधन बांधणार असल्याचंही बोललं जातंय. त्याचबरोबर विधासभेसाठी महंतांना तिकीट देणार असल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे.

दरम्यान, संजय राठोडंविरोधात महंतांनी दंड थोपटले तर संजय राठोडांपुढे मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. कारण पूजा चव्हाण प्रकरणानंतर आणि शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर बंजारा मतदार नाराज झाल्याच्या चर्चा आहेत. त्याचबरोबर पोहरादेवीला मानणारा वर्ग मोठा असल्यामुळे मतांची विभागणी होऊन संजय राठोडांना मोठा फटका बसू शकतो. तर उद्धव ठाकरेंकडून कोणती पावले उचलली जाणार याकडे लक्ष असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com