Patra Chawl : संजय राऊतांविरुद्ध साक्ष देणाऱ्या महिलेला बलात्काराच्या धमक्या | Sanjay Raut absent for ED inquiry | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

Patra Chawl : संजय राऊतांविरुद्ध साक्ष देणाऱ्या महिलेला बलात्काराच्या धमक्या

मुंबई - पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या रडावर असलेले संजय राऊत ईडीने समन्स बजावून देखील गुरुवारी ईडीसमोर हजर झाले नाहीत. 1,034 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना आधीच समन्स बजावलं आहे. आता या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना धमक्या येत असून संजय राऊत यांच्या विरोधात दिलेली साक्ष मागे घेण्यास सांगितले जात असल्याचं समोर आलं आहे. (Sanjay Raut ED inquiry news in Marathi)

हेही वाचा: "संजय राऊत स्वप्न पाहतात, त्यांना स्वप्नातच राहू द्या"; मुख्यमंत्र्यांचा टोला

पत्रा चाळ जमीन प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी गेल्या आठवड्यात मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यात पोलिस तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटलं की, ईडीसमोर जबाब दिल्यास आपल्याला बलात्कार आणि खुनाच्या धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. पत्रा चाळ जमीन प्रकरणात ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे.

मागील काही दिवसांपासून संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. संजय राऊत यांची १ जुलै रोजी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) सुमारे नऊ तास चौकशी करण्यात आली होती. सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास ईडी कार्यालयात दाखल झालेले राऊत साडेनऊच्या सुमारास बाहेर पडले होते.

याआधी एप्रिल महिन्यात ईडीने संजय राऊत यांचे अलिबागमधील आठ भूखंड आणि मुंबईतील एका सदनिकेवर जप्तीची कारवाई केली होती. तसेच ११.१५ कोटींच्या स्थावर मालमत्तेवर ईडीने टाच आणली होती. मनी लॉन्ड्रींग कायद्यांतर्गत पत्राचाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली होती.

Web Title: Sanjay Raut Absent For Ed Inquiry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top