'सोमय्यांसह मुलगा फरार', राऊतांच्या आरोपाने खळबळ

Sanjay Raut Allegations on Kirit Somaiya
Sanjay Raut Allegations on Kirit SomaiyaSakal

मुंबई : संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत प्रकरणी (INS Vikrant Case) किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता परत राऊतांनी एक ट्विट केलं असून किरीट सोमय्या मुलगा नील सोमय्यासह फरार झाले आहेत. मेहुल चोक्सीसारखे पळून तर गेले नाहीत ना? अशी शंका संजय राऊतांनी बोलून दाखवली आहे. (Sanjay Raut Allegations on Kirit Somaiya)

Sanjay Raut Allegations on Kirit Somaiya
उध्दव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका म्हणजे नोटा छापण्याची मशीन: किरीट सोमय्या

संजय राऊत सोमय्यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, ''किरीट सोमय्या मुलासह फरार झाला आहे. न्याय यंत्रणेवर दबाव आणून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली तरी सत्याचाच विजय होईल. प्रश्न इतकाच की, हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोक्सी प्रमाणे पळून तर गेले नाहीत?''

मेहुल चोक्सी आणि सोमय्यांचं जुनं नातं आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मिळत नाही तोपर्यंत त्यांना लपवून ठेवण्यात आलं आहे. राजभवनानं काही चुकीचं काम केलं तर त्यांची वाचलेली इज्जत देखील जाईल. मुंबई पोलिस या ठगांना शोधून काढतील. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात यावी. किरीट सोमय्या आणि चौक्सी दोघांनी मिळून बिल्डरांकडून पैसे जमवले आहे. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी दिल्लीसोबत संपर्क साधून खोटे कागदपत्रं तयार केली आहेत. मेहुल चोक्सी जिथे आहे तिथे हे दोन्ही ठग गेले नाहीत ना? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

'...तर राजभवनाची वाचलेली इज्जत देखील जाईल'

कालपासून सोमय्यांच्या माफिया टोळीची माणसं राजभवनात जाऊन कागदपत्रं तयार करत आहे. राजभवनाने देशविरोधी कृत्यात सामील होऊ नये. नाहीतर त्यांची वाचलेली इज्जत देखील जाईल. किरीट सोमय्याची लवकरच काही प्रकरणे बाहेर पडतील. या गुन्ह्याची व्याप्ती ही राज्यव्यापी आणि देशव्यापी आहे, असंही राऊत म्हणाले. किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतला वाचविण्यासाठी निधी गोळा केला होता. हा निधी राज्यपाल भवनाकडे पोहोचला नाही. याबाबत आम्ही राजभवानाकडून पत्र मागवलं होतं. त्यातून ही बाब समोर आली आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असे आरोप संजय राऊतांनी केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com