
NSEL घोटाळ्यात चौकशी झालेल्या कंपनीकडून सोमय्यांना पैसे : संजय राऊत
मुंबई : नॅशनल स्पॉट एक्सचेंजमध्ये (NSEL Scam) ५६०० कोटी रुपयांचा घोटाळा २०१३ मध्ये उघडकीस आला होता. यामध्ये तब्बल १३ हजार गुंतवणूकदारांचे पैसे अडकले होते. या घोटाळ्यात ज्या कंपनीची चौकशी झाली त्याच कंपनीकडून किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) लाखो रुपये मिळाल्याचा नवीन आरोप संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे.
हेही वाचा: किरीट सोमय्या मनसुख हिरेन कुटुंबीयांच्या भेटीला; शर्मा- वाझे नवे लक्ष्य
गेल्या तीन दिवसांपासून संजय राऊत दररोज सकाळी ट्विट करून किरीट सोमय्यांवर आरोप करतात. किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर ईडी ज्या कंपन्यांची चौकशी करतेय. त्यानंतर या कंपन्यांकडून किरीट सोमय्यांना पैसे जातात, असे गंभीर आरोप राऊत करत आहेत. तीन दिवसांपासून त्यांनी याप्रकरणी वेगवेगळ्या कंपन्यांची नावे किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानसोबत जोडली आहेत. राऊतांनी आज देखील NSEL घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांवर आरोप केले आहेत. याप्रकरणी सोमय्यांनी ईडी चौकशीची मागणी केली होती. त्यानतंर मोतीलाल ओसवाल कंपनीची चौकशी झाली. स्वतः किरीट सोमय्या चौकशीसाठी कंपनीच्या शिपायांच्या घरी गेले. तिथे जाऊन तमाशा केला. सोमय्यांनी गेल्या २०१८ ते २०१९ मध्ये मोतीलाल ओसवाल कंपनीकडून लाखो रुपये त्यांच्या युवक प्रतिष्ठान संस्थेसाठी घेतले, असे गंभीर आरोप राऊतांनी केले आहेत.
तीन दिवसांपासूनचे आरोप काय?-
संजय राऊत गेल्या तीन दिवसांपासून सोमय्यांवर आरोप करत आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी ईडीकडून चौकशी झाल्यानंतर त्याच कंपन्यांकडून सोमय्यांना पैसे मिळतात, असा आऱोप केला होता. दुसऱ्या दिवशी सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानचा संबंध पश्चिम बंगालमधील डेअरी कंपनीसोबत जोडला होता. या डेअरीची ईडीकडून चौकशी झाल्यानंतर सोमय्यांना लाखो रुपये मिळाल्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यानंतर आज राऊत पुन्हा गंभीर आरोप केले आहेत.
Web Title: Sanjay Raut Allegations On Kirit Somaiya Got Money From Company Involved In Nsel Scam
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..