'हिंदू ओवैसीं'ना शिवसेनेविरोधात उतरवले जातंय, संजय राऊतांची भाजपवर टीका | Sanjay Raut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

'हिंदू ओवैसीं'ना शिवसेनेविरोधात उतरवले जातंय, संजय राऊतांची भाजपवर टीका

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसेनेची आज शुक्रवारी (ता.२९) बैठक पार पडली. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेची येत्या १४ मे रोजी बीकेसीमध्ये सभा होणार आहे. तसेच मराठवाड्यात ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे, असे राऊत म्हणाले. राज्यात १ मे रोजी १२ सभा होणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हिंदुत्वाची खरी रक्षक असल्याचा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. (Sanjay Raut Attack On BJP For Their Politics In Maharashtra)

ओवैसींना मुस्लिम मते कापण्यासाठी उतरवले जात आहे. तसेच हिंदू ओवैसींवर हा प्रयोग उलटेल, असे ते म्हणाले. हिंदू ओवैसींना शिवसेनेविरोधात उतरवले जात आहे. हिंदु ओवैसी कोण आहे, हे माहित असल्याचा टोला राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला आहे.