

Eknath Shinde
esakal
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागण्यासाठी उभे राहण्याची वृत्ती शिंदे गटाची असल्याची खोचक टीका राऊत यांनी केली. युतीसाठी अमित शहा यांच्या दारात जाऊन जागा मागितल्या आणि आता भाजपने फेकलेल्या जागांवर निवडणूक लढवत असल्याने शिंदे गट लाचारपणा दाखवत असल्याचे राऊत म्हणाले.