Sanjay Raut News: 'रेशीम बाग हादरलं!'; संजय राऊतांच्या सुटकेनंतर कॉंग्रेसने भाजपला डिवचलं

sanjay raut bail granted congress sachin sawant and nana patole on bjp comment over pmla court slam ed over arrest
sanjay raut bail granted congress sachin sawant and nana patole on bjp comment over pmla court slam ed over arrest

Sanjay Raut Bail Granted : कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात १०० दिवसांपासून तुरुंगात असणारे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची आज जामिनावर सुटका झाली आहे. संजय राऊत हे आर्थर रोड तुरूंगातून बाहेर आले आहेत. यानंतर कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. तुरूंगाच्या बाहेर येताचा सुस्वागतम संजय राऊत असे म्हणत भाजप अन् आरएसएस वर देखील निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी जामीन मंजूर झाल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर पडले त्यानंतर सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे. "सुस्वागतम संजय राऊतजी, न्यायालयाच्या जामीन देण्याच्या निर्णयाने भाजपचे कार्यालय ते रेशीम बाग हादरले असेल यात शंका नाही!" असे ट्विट सावंत यांनी केले आहे.

तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील ट्विट करत "ईडीचा बेकायदेशीर कारभार, तोंडावर आपटले जोरदार! संजय राऊतांची अटक बेकायदेशीर म्हणून PMLA कोर्टाने 'ईडी'ला झापलं! यामुळे शासकीय यंत्रणेचा दबाव आणून काम करणाऱ्या 'ईडी'चा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे." असे म्हटले आहे.

हेही वाचा : बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

sanjay raut bail granted congress sachin sawant and nana patole on bjp comment over pmla court slam ed over arrest
Sanjay Raut Bail : PMLA कोर्टाने 'ईडी'ला झापलं! राऊतांची अटक बेकायदेशीर

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून राऊत हे आर्थर रोड तुरुंगात होते. यानंतर राऊतांकडून जामीनासाठी वेळोवेळी अर्ज करण्यात येत होते. दरम्यान ईडीकडून त्यांच्या जामीनाला विरोध करण्यात आला होता. दरम्यान आज जामीन मंजूर केल्यानंतर कोर्टानं संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची अटक बेकायदा असल्याचं सांगत काही निंदनीय निरीक्षण नोंदवली आहेत. काही मुद्यांवरुन ईडीवर कोर्टानं कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

sanjay raut bail granted congress sachin sawant and nana patole on bjp comment over pmla court slam ed over arrest
Gram Panchayat Election 2022: बिगूल वाजलं! राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com