Sanjay Raut: ‘त्या’ मुलीचा फोटो ट्वीट केल्यावरुन गदारोळ झाला पण, संजय राऊत भूमिकेवर ठाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

Sanjay Raut: ‘त्या’ मुलीचा फोटो ट्वीट केल्यावरुन गदारोळ झाला पण, संजय राऊत भूमिकेवर ठाम

गेल्या तीन दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊतांच्या एका ट्वीटची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे. मुलीचा फोटो ट्वीट केल्याप्रकरणी संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Sanjay Raut Barshi Girl Rape Case Victim Photo Tweet Case registered reaction after)

बार्शीत अत्याचाराची तक्रार दिल्याचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलीवर हल्ला झाला. त्याचाच फोटो संजय राऊतांनी ट्वीट केला. यातून त्यांनी भाजपवर आरोप केले आणि जोरदार टीकाही केली. त्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

यावर स्पष्टीकरण देताना मी काय चुकलो? असा उलट सवाल उपस्थित करत राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय असा गंभीर आरोप केला.

काय म्हणाले राऊत?

मी काय चुकलो? या मुलीवर कोयत्याचे वार झाले आहेत, या मुलीची आई माझ्याशी बोलली, तिच्या आईनं आक्रोश करत सरकारकडे ‘जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही, तर मला इच्छामरणाची परवानगी द्या’ अशी मागणी केली आहे.

पारधी समाजातली ही मुलगी आहे. बार्शीतल्या काही गुंड टोळ्यांनी तिच्यावर निर्घृणपणे हल्ला केला. अजूनही काही मुख्य आरोपी बाहेर आहेत.

जर मी दिल्लीत असताना मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवायचा असेल तर मी ज्या माध्यमातून पोहोचवायला हवा, त्या माध्यमातून पोहोचवला आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

मी त्या मुलीचं नाव, तिच्यावर झालेल्या अत्याचारांविषयी काहीही बोललेलो नाही. फक्त ‘माननीय मुख्यमंत्री या मुलीचं सांडलेलं रक्त वाया जाऊ देऊ नका’ इतकंच म्हटलं. यावर जर माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल, तर राज्यातला कायदा कोणत्या पद्धतीने काम करतोय, हे स्पष्ट दिसेल.

आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी एसआयटी स्थापन कली जाते. एका चुंबन प्रकरणाच्या व्हिडीओवरून एसआयटी स्थापन केली जाते. पण मी एका रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका मुलीचा फोटो ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतो.

एका खासदारावर, एका पत्रकारावर गुन्हा दाखल होतो. या राज्याची कायदा-सुव्यवस्था कशी काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय ते यातून स्पष्ट दिसतंय, अशा शब्दांत संजय राऊतांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.

टॅग्स :Sanjay Raut