छत्रपती संभाजी राजे आमचे, त्यांच आणि आमचं नातं आहे: राऊत

राज्यसभेसाठी शिवसेनेकडून छत्रपती संभाजी राजे यांना ऑफर देण्यात आली आहे.
sanjay Raut and Chhatrapati Sambhaji Raje
sanjay Raut and Chhatrapati Sambhaji RajeSakal

मुंबई : कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी आपली 'स्वराज्य' नावाची स्वतंत्र संघटना स्थापन केली आहे. ही संघटना भविष्यात राजकारणातही येऊ शकते असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता राज्यसभेसाठी ते निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक संभाजी राजे अपक्ष लढण्यावर ठाम असून शिवसेना, राष्ट्रवादीकडून त्यांना आपल्या पक्षात येण्यासाठी ऑफर येत आहेत.

शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांची लोक एकत्र आणण्यासाठी त्यांनी ही संघटना स्थापन केली. त्यानंतर राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी पक्षांना त्यांच्याकडून उमेदवारी देण्यासाठी आवाहनही केलं होतं. त्यानंतर त्यांनी राज्यसभा अपक्ष लढवणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान शिवसेनेचे संजय राऊत यांनी संभाजी राजेंना ऑफर दिली आहे. ते म्हणाले की, छत्रपती संभाजी राजे आमचे आहेत, त्यांच आणि आमचं नातं आहे, आम्ही त्यांना राज्यसभेसाठी शिवसेनेत येण्याची विनंती केली पण यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील." असं राऊत म्हणाले.

sanjay Raut and Chhatrapati Sambhaji Raje
'पुन्हा मोदीच'; पंतप्रधानपदासाठी IANS-C Voter सर्व्हेतून लोकांची पसंती

दरम्यान "राष्ट्रवादीनेही संभाजी राजेंना ऑफर दिली असून यामध्ये कुणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्न नाही, जागा शिवसेनेची आहे, आम्हाला आमची जागा लढवायची आहे." असं ते म्हणाले. शिवसेना शिवसेनेचाच उमेदवार पाठवण्यावर ठाम आहे, इतर नावही चर्चेत असतील पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असं ते म्हणाले. पण राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्यावर छत्रपती संभाजीराजे ठाम आहेत.

त्याचबरोबर केंद्र सरकारला विरोध करणाऱ्याच्या विरोधात यंत्रणा ज्या पद्धतीने काम करत आहे ते ठीक नाही, लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम केंद्रीय यंत्रणा करत आहे असा आरोप राऊत यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com