आम्हाला झालेल्या त्रासाची किंमत मोजायला लावणार; राऊतांचा BJPला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

आम्हाला झालेल्या त्रासाची किंमत मोजायला लावणार; राऊतांचा BJPला इशारा

sakal_logo
By
सुधीर काकडे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून, केंद्रीय तपास यंत्रणांच्या ससेमिऱ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्यातच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत विरोधकांना सुनावलं आहे. केंद्रीय यंत्रणांच्या तपास मागे लावून आमच्या लोकांना त्रास दिला जातोय असे म्हणत संजय राऊत यांनी शरद पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. तसेच आम्ही सहन करत असलेल्या त्रासाची किंमत त्यांनाही चुकवावी लागेल असं म्हणत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून तपास मागे लावून लोकांना त्रास देण्याचं काम देशात सुरू असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यानंतर आज संजय राऊत यांनीही आता या प्रकरणावर आपलं मत व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून, दबाव निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातो, आम्हीही यातून गेलो आहोत. मात्र आता आम्ही घाबरत नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं. राजकीय सुडातून छळ आमच्या लोकांचा छळ केला जातोय. आरोप करून फरार झालेल्या व्यक्तीमुळे माजी गृहमंत्री तुरूंगात आहेत असं म्हणत भाजप आणि केंद्रीय यंत्रणांवर टीका केली. पुढे ते म्हणाले की, शरद पवारांच्या भूमिकेला समर्थन असून, पवार साहेब बोलले तो संताप आहे. आम्हाला या सर्व गोष्टींची चिड असून आमचं सरकार देखील चिडीतून निर्माण झालेलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा: छापे-चौकशी हा नित्याचा भाग : शरद पवार

छगन भुजबळ, अनिल परब, प्रताप सरनाईक यांची नाव घेत दोष नसताना यांना त्रास दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच तुमच्याकडे सर्व धुतल्या तांदाळाचे आहेत का? पापी लोक, बुरखे घालून फिरताय असं म्हणत त्यांनी जो त्रास आम्ही भोगला, त्याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा भाजपला दिला आहे.

loading image
go to top