...तर मोदी सरकार कृषी कायदे पुन्हा आणेल - संजय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तर मोदी सरकार कृषी कायदे पुन्हा आणेल - संजय राऊत

पाच वर्षानंतर आघाडीसरकारकडून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

...तर मोदी सरकार कृषी कायदे पुन्हा आणेल - संजय राऊत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिम्मित उद्धव ठाकरे हेच पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार असे ठाम वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. 'साम' टीव्हीला दिलेल्या विषेश मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेखातर शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असल्याचेही राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे पाच वर्षानंतर आघाडीसरकारकडून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा: उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहणार; संजय राऊत

यावेळी राऊतांनी शेतकरी कृषी कायद्या संदर्भात प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कायदे परत आणू शकतात. नरेंद्र मोदी कधीही झुकत नाहीत. जनतेसमोर तर कधीच नाही. शेतकरी चिरडून मारले, लाठीमार झाला. कधी कृषी कायदे मागे घेतले? १३ राज्यातील पोटनिवडणुकीत पराभव झाला. इतर राज्यात नुकसान होईल या भीतीने निर्णय घेतला. दुर्दैवाने उत्तर प्रदेशामध्ये सत्ता आली तर पुन्हा कायदे आणतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकारने प्रस्ताव मांडला आहे. आता त्यावर कोणता निर्णया होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: 'संविधानाबाबत राजभवनात तर...' राऊत यांचा राज्यपालांवर निशाणा

दरम्यान, राष्ट्रवादीचे शरद पवार हे सरकार चालवतात का? यावर राऊत म्हणाले, पवार हे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी काही सुचविले तर ते राबवायला पाहिजे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये इतकी कुरबुर नाही. भाजप-शिवसेना सरकार असताना भांडी वाजून फुटत होती. इथे मुख्यमंत्र्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोणाचा हस्तक्षेप नाही.

loading image
go to top