India-China Troops Clashed : गुजरात विजयाच्या जल्लोषात देशाच्या सीमा उघड्या पडल्या; संजय राऊतांचा आरोप

भारत-चीन सीमेवर दोन्ही बाजूनं झटापट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
Sanjay Raut
Sanjay RautEsakal
Summary

भारत-चीन सीमेवर दोन्ही बाजूनं झटापट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

India-China Troops Clashed : भारत-चीनच्या सीमेवर कायमच तणाव असतो. आता अशा परिस्थितीत भारत-चीन सीमेवर दोन्ही बाजूनं झटापट (India-China Troops Clashed) झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. यात 20 ते 30 सैनिक जखमी झाले आहेत.

अरुणाचल प्रदेशजवळील (Arunachal Pradesh) सीमा रेषेजवळ हा सर्व प्रकार घडला आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांच्या कमांडरमध्ये चर्चा झाल्याची माहितीही सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकारावर भारताच्या अधिकृत निवेदनाची प्रतिक्षा केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केलंय.

Sanjay Raut
Agnipath Scheme : ज्यांना 'अग्निपथ'बाबत अडचण आहे, त्यांनी सैन्यात भरती होऊ नये; न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

झटापटीचा हा सर्व प्रकार 9 डिसेंबर 2022 रोजी घडला आहे. सध्या देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत. चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूंनी देशात घुसतोय. त्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय लावून धरून सरकारला प्रश्न विचारू, पण सध्याची परिस्थिती खूपच गंभीर बनत चालली आहे. सरकार राजकारणामध्ये पडल्यामुळं चीन-पाकिस्तान हे देशाचे दुश्मन सीमेवरती धडका मारत आहेत. प्रधानमंत्री, संरक्षणमंत्र्यांनी देशापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला आहे. आता कालच्या घटनेवरून हे स्पष्ट झालंय.

Sanjay Raut
Narendra Modi : मोदींची हत्या करायला तयार राहा म्हणणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक

ही झटापट शुक्रवारी झाली असून काल हे प्रकरण समोर आलं. आपले जखमी सैनिक आसामच्या गुवाहाटीमध्ये उपचार घेत आहेत. सत्य काय आहे हे कळायला मार्ग नाही. राजकारण कोणत्या थराला गेलं आहे, हे यावरुन स्पष्ट होत आहे. राजकारणापायी देशाला वेठीस धरण्याचं काम सुरु आहे. देशाच्या सत्ताधाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून देशाच्या सीमांकडं लक्ष द्यावं, असं आवाहनही राऊत यांनी केंद्र सरकारला केला आहे. दरम्यान, चिनी सैनिकांच्या या कारवाईला भारतीय जवानांनी देखील तोडीस तोड प्रत्युत्तर दिलंय. दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीमुळं सीमेवर तणावाची स्थिती असून सैन्य दल अधिक अलर्ट झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com