esakal | तंगड्या तोडण्याची भाषा इथं चालत नाही : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

तंगड्या तोडण्याची भाषा इथं चालत नाही : संजय राऊत

इंदिरा गांधींच्या भूमिकेचे समर्थन

- कोल्हापूरचा आदर 

तंगड्या तोडण्याची भाषा इथं चालत नाही : संजय राऊत

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : देशात लोकशाही आहे त्याला आम्ही मानतो. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे राज्य आहे. त्यामुळे राज्यात त्यांचा सन्मान व्हायला हवा, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच तंगड्या तोडण्याची भाषा करू नका. तंगड्या प्रत्येकालाच आहे, अशा शब्दांत त्यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे हे राज्य आहे. त्यांच्या विरोधकांचाही सन्मान केला जात होता. शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कायम नतमस्तक होण्याचे काम केले. ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे आम्हाला इतर कोणी ज्ञान देण्याची गरज नाही. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची कोल्हापूर, सातारा ज्या गाद्या आहेत त्याविषयी आमचा कायम आदर. त्याचा आदर ठेवणे आमचे आणि सर्वांचे काम आहे.

इंदिरा गांधींच्या भूमिकेचे समर्थन

इंदिरा गांधी यांच्या भूमिकेचे कायम समर्थन केले आहे. त्यावर मला जास्त काही बोलायचे नाही. आमच्या मनात इंदिरा गांधी यांच्याबद्दल कायम आदर आहे. 

कोल्हापूरचा आदर 

कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्याविषयी कायम आदर आहे. साताऱ्याचे शिवेंद्रराजे ते कायम संयमाने काम करतात. कल्पनाताई भोसले यादेखील शिवसेनेत होत्या. त्यांनी शिवसेनेतून काम केले. 

जनता प्रश्न विचारतेच

तुम्ही कितीही मोठे असा. पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही जनता प्रश्न विचारते. 

तंगड्या तोडण्याची भाषा शोभत नाही

तुमच्याकडून तंगड्या तोडण्याची भाषा शोभत नाही. तुम्ही पक्षाचे नेते आहात. पण एक लक्षात ठेवा प्रत्येकाला तंगड्या आहेत. 

सत्ता गेल्यावर वैफल्य

सत्ता गेल्यावर माणसाला वैफल्य येते. मात्र, अशाप्रकारचे वैफल्य नको, असेही संजय राऊत म्हणाले.