Sanjay Raut Arrested : 16 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक; आज कोर्टात हजर करणार

Sanjay Raut
Sanjay RautSakal Digital

Sanjay Raut Arrested in Patra Chawl Land Scam Case

गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी रात्री उशिरा अटक केली. राऊत यांना ED कडून सोमवारी सकाळी वैद्यकीय तपासणी करून साडे अकरा वाजता न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्या पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येईल. तब्बल १६ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली असून या अटकेचे पडसाद सोमवारी सकाळी राज्यभरात उमटण्याची चिन्हे आहेत.

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात अनियमितता झाल्याचा ईडीचा आरोप आहे. तसेच संजय राऊत यांच्या पत्नी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत झालेल्या संबंधित व्यवहारात मनीलॉण्डरिंग झाल्याचा आरोप आहे. १ जुलै रोजी चौकशीसाठी राऊत ईडी अधिकाऱ्यांपुढे जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित झाले होते. त्यानंतर त्यांना दोनदा समन्स बजावले होते. अखेर २७ जुलैला तपास यंत्रणेने राऊत यांना चौकशीसाठी बोलावले होते; परंतु संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत राऊत चौकशीला गैरहजर राहिले. तसेच या प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांना दिले होते; परंतु त्याबाबतची पूर्तता राऊत यांच्याकडून झाली नव्हती. रविवारी सकाळी सात वाजताच ‘ईडी’चे दहा अधिकारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांसह राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले. संध्याकाळी चारच्या सुमारास ईडीने राऊतांना ताब्यात घेतले.

Sanjay Raut
संजय राऊतांवर कारवाई झालेला पत्राचाळ घोटाळा नेमका काय आहे?

रात्री उशिरापर्यंत राऊतांची ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. रात्री साडे बाराच्या सुमारास ईडीने राऊतांना अटक केली. कार्यालयाबाहेर माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत म्हणाले, ईडीने संजय यांना अटक केलीये. भाजपाला संजय राऊतांची भीती वाटते. त्यांच्या अटकेसंदर्भात अद्याप आम्हाला कोणतीही कागदपत्रे देण्यात आलेली नाही. माझ्या भावाला या प्रकरणात गोवलं जातंय.

दरम्यान, ईडी कार्यालयाकडे जाताना राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली होती. झुकेगा नहीं’ असे म्हणत अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याचा आणि शिवसेना न सोडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. ईडीने राऊत यांच्या निवासस्थानी केलेल्या छापेमारीदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते. (Sunil Raut News)

Sanjay Raut
Sanjay Raut : क्राईम रिपोर्टर, शिवसेना खासदार ते ED च्या जाळ्यात

पोलिसांचा चोख बंदोबस्त
ईडीच्या झडतीदरम्यान शिवसैनिक मोठ्या संख्येने राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर जमले आणि ईडीच्या कारवाईविरोधात निदर्शने केली. हातात भगवे झेंडे आणि फलक घेऊन समर्थकांनी घोषणाबाजी केली. (Shiv Sena News) त्या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या निवासस्थानासह दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालय परिसरातही मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राऊत यांना ईडी कार्यालयात नेणार असल्याचे कळताच तेथेही शिवसैनिकांनी गर्दी करायला सुरुवात केली; परंतु पोलिसांनी ईडी कार्यालयाकडे जाणारे रस्ते बंद केले, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, केंद्रीय राखीव दलाची एक तुकडी तसेच स्थानिक पोलिसांचे ३५ कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com