
इकडे संजय राऊतांना अटक; तिकडे शरद पवार दिल्लीला रवाना
शिवसेना खासदार संजय राऊत यांना १६ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली. या कारवाईबद्दल सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. पवार दिल्लीला गेल्याची माहिती हाती येत आहे.
हेही वाचा: Sanjay Raut Arrested : 16 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक; आज कोर्टात हजर करणार
काल सकाळी सात वाजल्यापासून संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या निवासस्थानी ईडीकडून त्यांची चौकशी सुरू होती. १६ तासांच्या चौकशीनंतर अखेर ईडीने राऊतांना रात्री अटक केली. काल दिवसभर हे नाट्य सुरू होतं. त्यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र शरद पवार यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. या सगळ्या दरम्यान शरद पवार यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा: Sanjay Raut Arrest Live Updates: राऊतांच्या अटकेवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
शरद पवार अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. काल दिवसभर शरद पवार मुंबईत होते. मात्र माध्यम प्रतिनिधींना त्यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली नव्हती. योग्य वेळ आल्यावर आपण या विषयावर भाष्य करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं होतं. मात्र आता ते दिल्लीला रवाना झाले आहेत. आता या प्रकरणात शरद पवार काय बोलणार, कोणती पावलं उचलणार याकडे लक्ष लागून आहे.
Web Title: Sanjay Raut Ed Enquiry Ncp Chief Sharad Pawar Is In Delhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..