Sanjay Raut : "काश्मीरसोबत बाळासाहेबांचे..."; भारत जोडो यात्रेतील सहभागावर राऊतांचे स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut explanation on participation in Bharat Jodo Yatra

Sanjay Raut : "काश्मीरसोबत बाळासाहेबांचे..."; भारत जोडो यात्रेतील सहभागावर राऊतांचे स्पष्टीकरण

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज यावर स्पष्टीकरण दिले.

राऊत यांनी राहुल गांधींचा दौरा क्रांतिकारक असल्याचे वर्णन केले. भारत जोडो यात्रेत सहभागी होणं हे कर्तव्य असल्याचे संजय राऊत म्हणाले. राऊत २० तारखेला यात्रेत सहभागी होतील. (Sanjay Raut explanation on participation in Bharat Jodo Yatra)

संजय राऊत म्हणाले, "देशातील तरुण कन्याकुमारी पासून ते काश्मिरपर्यंत ४ हजार किलोमीटर देशातील हजारो लोकांसोबत देशाच्या एकतेसाठी चालत आहे. लोक त्याला पाठिंबा देत आहेत. अशा यात्रेत सहभागी होणे हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे."

"महाराष्ट्रात ही यात्रा आली तेव्हा आदित्य ठाकरे नांदेडला यात्रेत सहभागी झाले. आता यात्रेचा शेवटचा टप्पा आहे. माझं राहुल गांधी यांच्यासोबत बोलणं झालं होत की मी शेवटच्या टप्प्यात येईल. जम्मू आणि काश्मीर देशासाठी संवेदनशील भूभाग आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे त्या भूमीशी भावनिक नातं होतं.  त्या नात्याने मी जम्मू-काश्मीरच्या भूमीवर शिवसेनेतर्फे उपस्थित राहील," असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा: Amit Deshmukh : काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर देखील टीका केली. नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यात राजकारण आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा आहे. कामाचे श्रेय लाटण्यासाठी हा दौरा आहे. मात्र जनतेला सर्व माहित आहे. 

हेही वाचा: Prakash Ambedkar: एकीकडे ठाकरेंसोबत युती तर... CM शिंदे-आंबेडकर यांच्यात बंद दाराआड चर्चा