esakal | 'फ्री काश्मीर'वरून फडणवीसांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut gives answer on Devendra Fadnavis tweet on Free Kashmir

'फ्री काश्मीर'वरून फडणवीसांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जेएनयुतील हल्ल्याविरोधात मुंबईतील आंदोलनात 'फ्री काश्मीर'चे पोस्टर झळकल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

'फ्री काश्मीरचे पोस्टर घेऊन थांबलेल्या 'त्या' मुलीनेच सांगितले....

रविवारी रात्रीपासून गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेर आज (मंगळवार) आझाद मैदानात हलविण्यात आले आहे. सोमवारी रात्री याठिकाणी मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच याठिकाणी झळकाविलेल्या पोस्टरवरून वाद सुरु झाले आहेत. या आंदोलनात मेहक नावाची तरुणी हातात फ्री काश्मीर असे पोस्टर दिसले होते. यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

याविषयी बोलताना राऊत म्हणाले, की काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. काश्मीर खोऱ्यातील नागरिकांसाठी इंटरनेटवर बंदी घालण्यात आली असून, अनेक दिवसांपासून ते हक्कांपासून दूर आहेत. तेथून नागरिकांवर घातलेल्या बंधनांपासून मुक्त केले पाहिजे. आपण याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.