Sanjay Raut Interview Viral : अटकेपूर्वी मोदींपासून फडणवीसांचे कौतुक; वाचा...

अटकेच्या एक दिवसाआधी संजय राऊत यांनी मुलाखत दिली होती
 Sanjay Raut Interview News
Sanjay Raut Interview News Sanjay Raut Interview News

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केली. त्यांना सोमवारी (ता. १) न्यायालयात हजर केले असता ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. अटकेच्या एक दिवसाआधी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत (Interview) दिली होती. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केले होते. मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. आता राऊत यांची मुलाखत व्हायरल झाली आहे. (Sanjay Raut Interview News)

नरेंद्र मोदी व ठाकरे कुटुंबाचे जुने नाते आहे. आम्ही सत्तेत असलो की नसो. भाजपने आमच्यासोबत कितीही राजकारण केले. आमचा मोदींवर विश्वास आहे. आमचा अमित शहा यांच्यावर विश्वास आहे. ते देशाचे गृहमंत्री आहे. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात भावनिक नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे ते भेटायला गेले आणि अर्धा-पाऊण तास चर्चा केली तर केली, असे उद्धव ठाकरे दिल्लीत गेले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत (Sanjay Raut) बोलत होते.

 Sanjay Raut Interview News
रावसाहेब दानवेंच्या विधानाने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या; सत्तार साहेब...

भाजपला जशी नरेंद्र मोदींची गरज आहे, तशी शिवसेनेला ठाकरे कुटुंबाची गरज आहे. आजच्या तारखेत नरेंद्र मोदींशिवाय (Narendra Modi) भाजपचे अस्तित्व पाहू शकात का? भाजपचा विस्तार झाला आहे तो नरेंद्र मोदींची ताकद आहे. त्यांची प्रतिष्ठा आहे. उद्धव ठाकरेही तसेच आहे, असे शिवसेनेसाठी ठाकरे कुटुंब का महत्त्वाचे, या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय दिसत नाही. मोदी जोपर्यंत राहतील तोपर्यंत देशहिताचे काम करतील, असे पंतप्रधानपदाचा उत्तम उमेदवार कोण असेल? शरद पवार की राहुल गांधी? याला उत्तर देताना राऊत म्हणाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकेल की नाही, हे सांगता येणार नाही. परंतु, भाजप मजबूत पक्ष आहे, असेही प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.

 Sanjay Raut Interview News
संजय राऊतांच्या अटकेने शिवसेनेचे किती नुकसान? ठाकरे कुटुंबासाठी किती महत्त्वाचे?

देवेंद्र फडणवीसांबद्दल सहानुभूती

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल सर्वांना सहानुभूती आहे. ते अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी लढत होते. ते त्याला पात्र होते. आता सरकार स्थापन झाल्यावर त्यांना वेगळे करण्यात आले. ते आमचे मित्र आहे, असे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री का करण्यात आले, या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले.

पत्राचाळ बघितली नाही

मला जेव्हाही बोलावले जाईल तेव्हा मी ईडीसमोर हजर होईन. मी आजपर्यंत पत्राचाळही पाहिली नाही. मला एक-दोन वर्षांपूर्वी याविषयीच्या बातम्या वर्तमानपत्रात येऊ लागल्यावर कळले, असे तुम्हाला अटक होऊ शकते असे वाटते का, या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले होते. प्रवीणसोबत माझे नाते आहे. ते माझे मित्र आहे. प्रत्येकाचे मित्र असतात. भाजपचेही मित्र आहेत, असेही संजय राऊत पत्राचाळमधील मुख्य आरोपी प्रवीण राऊतसोबतच्या संबंधावर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com