रावसाहेब दानवेंच्या विधानाने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या; सत्तार साहेब...

Raosaheb Danve and Abdul Sattar News
Raosaheb Danve and Abdul Sattar NewsRaosaheb Danve and Abdul Sattar News

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुत्ववादी राजकारण करतात. ते हिंदुत्ववादी पार्टीचे आहे, असे म्हणत आमदार अब्बुद सत्तार (Abdul Sattar) यांनी शिंदेंची स्तुती केली. सोबत विकास निधीसाठी पैसे व विकासकामांसाठी आभार मानले. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे दोन नेते एकत्र आले तर काय होऊ शकते हे लोकांना चांगलेच माहिती आहे, असेही म्हटले. मात्र, रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

औरंगाबादच्या (Aurangabad) सिल्लोडमध्ये आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी अब्दुल सत्तारांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने नवीन शक्ती घेऊन कार्य करीत राहू. आमचे रिमोट कंट्रोल शिंदे व फडणवीस यांच्याकडे आहे, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.

Raosaheb Danve and Abdul Sattar News
Kedar Dighe : आज बाळासाहेबही म्हणाले असतील, शाब्बास संजय!

यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे भाषण झाले. ‘सत्तार (Abdul Sattar) साहेब, तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पैसे घेतले आणि लखपती झाले. मात्र, मी लोकपती असल्याचे’ रावसाहेब दानवे म्हणाले. त्यांच्या या विधानाने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. रावसाहेब दानवे यांनी विकासकामांच्या निधीच्या पैशांचा उल्लेख केला की इतर कोणत्या पैशांचा याची चर्चा सभेत पाहायला मिळाली.

नवीन चर्चेला फुटले तोंड

शिवसेनेच्या (Shiv sena) आमदारांनी बंड केल्यानंतर पैशांचा मुद्दा उपस्थित झाला होता. संजय राऊत यांनी प्रत्येक बंडखोर आमदारांनी ५० कोटी घेतल्याचा आरोप केला होता. ५० खोके दिल्याने आमदारांनी बंड केल्याचे ते म्हणत होते. यामुळे आमदारांनी किती पैसे घेतले हा प्रश्न चर्चेचा विषय झाला आहे. अशात रावसाहेब दानवे यांनी ‘पैसे घेतले आणि लखपती झाले’ असे विधान केल्याने नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com