esakal | 'भाजपच्या प्रचाराचे कौतूक पण ममताच सत्ता राखणार'

बोलून बातमी शोधा

sanjay raut
'भाजपच्या प्रचाराचे कौतूक पण ममताच सत्ता राखणार'
sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: सध्या देशात कोरोनाचा कहर सुरू असताना या निवडणुकांच्या निकालात सामान्यांना काही रस नाही. दुपारपर्यंत सर्व निकाल येतील त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या तृणमूलचा विजय होईल. तसेच पंढरपूरची जागाही राष्ट्रवादी राखेल अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पॉंडेचेरी आणि तामिळनाडूत सत्तांतर होईल तर इतर ठिकाणी पहिले सरकारेच सत्ता राखतील. ममतांच्या धाडसाचे कौतूक आहे. ममतांना हरवणे भाजपाला शक्य नाही पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच सत्ता स्थापन करेल. मंगळवेढा - पंढरपूर मतदारसंघातही राष्ट्रवादी जागा राखेल.

हेही वाचा: 'हे सुरुवातीचे कल पण ममतांचा पराभव होणारच'

देशात एकीकडे कोरोनाचा कहर होत आहे. रोज ४ लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत. तर दुसरीकडे आजच्या निकालांवर अनेक राजकीय पक्षांचे लक्ष असून त्याच्यावर अनेक पक्षांचे भवितव्य ठरणार आहे.