esakal | 'हे सुरुवातीचे कल पण ममतांचा पराभव होणारच'
sakal

बोलून बातमी शोधा

Vijaya Rahatkar

'हे सुरुवातीचे कल पण ममतांचा पराभव होणारच'

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: सध्या पश्चिम बंगालच्या निकालाचे कल येत आहेत. त्यामध्ये तृणमूल 133 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप त्यापाठोपाठ 109 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने जेमतेम ४ चार जागांवर आघाडी घेतली आहे. या कलांबद्दल बोलताना भाजपच्या नेत्या विजया रहाटकर म्हणाल्या की, ममता आणि त्यांच्या सरकारबद्दल पश्चिम बंगालमध्ये तीव्र संताप असल्याने भाजप तिथं सत्ता मिळेवेल.

'सध्या जरी भाजप तृणमूलच्या मागे असले तरी ते लवकर पुढे जाईल कारण हे सुरुवातीचे कल आहेत. तसेच भाजपाने तिथं उत्तम संघटन केले आहे. केंद्राने राज्यात अनेक चांगल्या योजना राबवल्या आहेत. त्याचा फायदा भाजपाला होणार आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाच्या मुद्द्यावर भाजपाला सत्ता मिळेल.' अशी प्रतिक्रिया भाजपाच्या नेत्या विजया रहाटकर यांनी दिली आहे.

हेही वाचा: सत्ताधारी सत्ता राखणार की भाजप मुसंडी मारणार?

पश्चिम बंगालमध्ये २९२ जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजपच्या मुख्य नेत्यांनी मोठा प्रचार केला होता. भाजपच्या शेकडो सभा आणि रॅली झाल्या होत्या.

loading image