Maharashtra Politics : त्यांच्या घरातील कुत्र्यालाही सुरक्षा, मात्र माझ्यासारख्या…; संजय राऊत भडकले

Sanjay raut on reduced security of leaders uddhav thackeray group mp rajan vichares petition
Sanjay raut on reduced security of leaders uddhav thackeray group mp rajan vichares petition esakal

ठाकरे गटातील आमदारांची सुरक्षा शिंदे-फडणवीस सरकारने काढून घेतल्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी हाय कोर्टात याबाबत फौजदारी याचिका दाखल केली आहे. ठाकरे गटातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यावरून संजय राऊत यांनी सरकारबद्दल संताप व्यक्त केला आहे.

राजन विचारे यांनी हाय कोर्टात उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. फुटीर चाळीस आमदारांच्या घरातील कुत्र्यांनादेखील सुरक्षा आहे. माझ्यासारख्या माणसाची सुरक्षा पुर्ण काढली आहे. ती कोणत्या नियमाने काढली? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

राऊत म्हणाले की, कालपर्यंत ज्यांना वाय प्लस सुरक्षा होती ती एका रात्रीत काढून टाकली. आमच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा तुम्ही कोणत्या नियमाने काढली आणि तुम्हाला धोका इतका कसा वाढला असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Sanjay raut on reduced security of leaders uddhav thackeray group mp rajan vichares petition
Sushma Andhare : उर्फी प्रकरणात अंधारेंची उडी; कंगना, केतकी अन् अमृता फडणवीसांचे नाव घेत म्हणाल्या…

संजय राऊत म्हणाले की, फुटीर आमदारांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकासाठी ४० सुरक्षा रक्षक आहेत, त्यासोबत त्यांच्या घरातले नोकर, कुत्रे, मांजरी यांना सुरक्षा देण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये असलेली सुरक्षा व्यवस्था पाहूण मला आश्चर्य वाटतं. अनेकदा देशाच्या सीमेवरील चौकीत सुद्धा एवढी फौज नसते, मी आकडे देऊ शकतो असेही संजय राऊत म्हणाले.

Sanjay raut on reduced security of leaders uddhav thackeray group mp rajan vichares petition
Corona Outbreak : कोरोनाला हलक्यात घेऊ नका! देशात 24 तासांत 1300 टक्के वाढ

राजन विचारे यांनी शिंदे गटातील खासगी सचिवांना आणि कार्यकर्त्यांना तसेच कोणतेही पज नसून फक्त मुख्यमंत्र्याचे निकटवर्तीय असल्यामुळे काही लोकांना सुरक्षा पुरवण्यात आली असल्याचे म्हटले आहे. मात्र उद्धव ठाकरे गटातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com