Sanjay Raut : "पुतीन, बायडेन, चार्ल्स यांनी बैठक घेऊन विचारलं, उद्धव ठाकरे कोण?" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

Sanjay Raut : "पुतीन, बायडेन, चार्ल्स यांनी बैठक घेऊन विचारलं, उद्धव ठाकरे कोण?"

नागपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, पुतीन आणि चार्ल्स यांनी एक बैठक घेऊन उद्धव ठाकरेंबद्दल विचारणा केली आहे" असा दावा संजय राऊतांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले होते की, "अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या एका माणसाने विचारलं की, एकनाथ शिंदे नावाचा व्यक्ती कोण आहे?" त्यांच्या या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता संजय राऊत यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: Viral Video : सलाम! कंबरेएवढ्या बर्फातून भारतीय सैनिकांची वाटचाल

"रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि इंग्लंडचे चार्ल्स यांची सकाळी बैठक झाली आणि विचारलं उद्धव ठाकरे कोण आहेत. या माणसाची कमाल आहे, तो माणून हार मानत नाही, तो कोण आदमी है, उद्या जर युद्धाची परिस्थती निर्माण झाली तर त्यांची आपल्याला मदत घ्यावी लागेल.

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की सुद्धा विचारतात की उद्धव ठाकरे कोण आहेत..." असं संजय राऊत बोलताना म्हणाले आहेत. तर सगळ्या देशातील प्रमुख लोकं विचारतात की ठाकरे कोण आहेत. क्लिंटन नाही... त्यांचा जमाना संपला आहे, कळलं पाहिजे असाही टोला संजय राऊतांनी लावला आहे. तर त्यांच्या या वक्तव्यामुळे आता चर्चा सुरू झाल्या आहेत.