अक्कल दाढ उशिरा येते; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

अशा टीकेनं आहे तेही गमावून बसाल, राऊतांचा राज ठाकरेंना सल्ला
Politics
Politicsesakal
Updated on
Summary

अशा टीकेनं आहे तेही गमावून बसाल, राऊतांचा राज ठाकरेंना सल्ला

मनसेचा गुढी पाडवा मेळाव्यात काल शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जातीवादाचे आरोप केले आहेत. यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आज शिवसेनेकडूनही त्यांच्या या आरोपाला तिखट प्रतिक्रिया दिली आहे. अक्कल दाढ उशिरा येते, असा सणसणीत टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. आज मुबंईत ते बोलत होते.

Politics
पवारांचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'तीन-चार महिने भूमिगत राहणारा...'

राज ठाकरेंनी काल शिवजी पार्क येथे मेळाव्याला संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करून सरकार आणि मुस्लिमांवर निशाणा साधला होता. त्याला प्रतित्त्युर देताना राऊत म्हणाले, काल मुंबईत मेट्रोसह अनेक उद्घाटनं झाली. लोकार्पण झाली त्यावर बोला, भोंग्याचं काय करायचं त्यासाठी सरकार समर्थ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी मराठी भाषा भवनचं स्वागत करायला हव होत. त्याविषयी कुणी काही बोलेल नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शरद पवार यांनी जातीयवाद पसरवला या राज ठाकरेंनी केलेल्या आरोपावर ते म्हणाले, आपणही शरद पवार यांच्या चरणाशी सल्लामसालत करण्यासाठी जात होता. कशाकरता आपण टोलेबाजी करायची. तुमच्या भाषणाला तेवढ्यापुरत्या टाळ्या मिळतात, आणि त्या टाळ्यांनाही प्रायोजक असतात, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Politics
"शरद पवारांचे नाव घेतले की…"; राज ठाकरेंच्या टिकेवर आव्हाडांचे प्रत्युत्तर

पुढे ते म्हणाले, काल शिवतीर्थावरचा भोंगा हा भाजपचा होता. यावरून काल सबंध महाराष्ट्राला दिसले की, अक्कल दाढ उशिरा येते. अशा टीकेनं आहे तेही गमावून बसाला, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना दिला आहे. कारण भाजपा स्वत:ची मळमळ दुसऱ्याच्या भोंग्यातून बाहेर काढत असल्याचेही सांगत राऊतांनी भाजपावरही निशाणा साधला.

काय म्हणालेत राज ठाकरे भाषणात

दरम्यान, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रातील जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाले असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. आम्ही जातीपातून बाहेर पडत नाहीत, मग हिंदू कधी होणार पुढे असा सवालही त्यांनी केला. 'तो त्या जातीचा हा या जातीचा असं म्हणत फूट पाडत पाडत कधी मराठा आरक्षणाचं आमिष दाखवायचं. बाबासाहेब पुरंदरे यांचं सॉफ्ट टार्गेट आहे. आम्हाला इतिहास वाचायचा नाही. लिहिला कोणी, पुरंदरे, ब्राह्मण, अच्छा म्हणजे यांनी चुकीचा लिहिला असणार,' असे देखील ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com