
Sanjay Raut : 'सामना'मधल्या पत्रकाराचा लेखी जबाब; 'राऊतांवरील हल्ल्यासंदर्भात 'तसं' म्हणालोच नव्हतो'
मुंबईः काल संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर मारण्याची सुपारी दिली आहे, असा आरोप केला होता. परंतु या प्रकरणी ज्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार संजय राऊतांनी हा दावा केला होता त्याच व्यक्तीने आज पोलिसात जबाब देऊन मी 'तसं' म्हटलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
संजय राऊत यांचा भांडाफोड झाल्याचं ठाकरे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात उपद्व्याप सुरू आहेत. तसंच संजय राऊत यांचे डोकं फिरल आहे, जेलमधून बाहेर आल्यावर मानसिक संतूलन बिघडलं असल्यामुळे ठाणे किंवा पुण्यात मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचाराची गरज असल्याची जहरी टीका म्हस्केंनी केली.
नरेश म्हस्के पुढे म्हणाले की, पोलिस अधिकारी आज राऊत यांच्याकडे जबाब घेण्यासाठी गेले होते. जबाब देताना संजय राऊत यांनी 'सामना'मधील एका व्यक्तीने त्यांना सांगितले की राजा ठाकूर आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न, हल्ला होणार आहे.
दुसऱ्या बाजूला, याच 'सामना'मधील काम करत असलेल्या व्यक्तीने जबाबामध्ये असे सांगितले आहे की, ठराविक असे कोणत्याही आमदार, खासदार यांचे नाव घेऊन ते त्यांच्यावर हल्ला करणार याबाबत काही ही एक सांगितलेलं नाही. श्रीकांत शिंदे आणि राजा ठाकूर यांचं आणि कोणत्याही व्यक्तीचे नाव घेऊन बोलेलेलो नाही, असं स्पष्ट झालेलं असल्याचं म्हस्के म्हणाले.
नरेश म्हस्के पुढे म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर अर्धा तासात तक्रार दाखल करू. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. सकाळी उठायचे आणि भोंगा सुरू करायचा, स्वतः भोवती सहनभुती तयार करायची म्हणून संजय राऊत हे सगळं करत असल्याचा आरोप त्यांनी केला.