
खासदार राऊत यांनी सहाव्या जागेबाबतच्या उमेदवारीचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचे स्पष्ट केलंय
घडामोडींना वेग; खासदार राऊत, संजय पवार उमेदवारी अर्ज भरणार
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आज खासदार संजय राऊत आणि संजय पवार दुपारी विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसह उमेदवारी अर्ज भरणार आहोत. राज्यसभा निवडणुकीसाठी सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना सावधगिरीने पावलं टाकताना दिसत आहे. खासदार राऊत यांनी सहाव्या जागेबाबतच्या उमेदवारीचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचे स्पष्ट केले आहे. राजर्षी शाहूंच्या घराण्याचा सन्मान राखण्याच्या हेतूनेच संभाजीराजेंना शिवसेनेच्या कोट्यातील जागा देण्याची तयारी शिवसेनेने केली होती असंही ते म्हणाले आहेत.(Rajya Sabha News)
हेही वाचा: शिवसेना राज्यसभेसाठी अर्ज करण्याआधी अनिल परबांच्या घरी ED ची छापेमारी
खासदार राऊत यांच्यासह आज शिवसेनेचे एकूण दोन उमेदवार राज्यसभेसाठी अर्ज भरत आहेत. त्यामुळे त्यांनी काल शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार हेही अर्ज भरण्यासाठी येणार आहेत. दरम्यान, राज्यसभेच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरलेले संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देण्याऐवजी शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे संभाजीराजे यांचे समर्थक व काही मराठा संघटनांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, यासंदर्भात काल राऊत म्हणाले की, शिवसेनेने सहाव्या जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्याचा आणि संभाजीराजेंच्या अपमानाचा काहीही संबंध नाही. हा विषय आमच्या दृष्टीनं संपलेला आहे. संभाजीराजे यांना शिवसेनेच्या कोट्यातून जागा द्यायला आम्ही तयार झालो होतो. त्यांचा आणि घराण्याचा सन्मान राखण्याचाच हेतू यामागे होता. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी ४२ मतांचा कोटा लागतो, त्यासाठी संभाजीराजेंना मदत करण्याची आमची तयारी होती. यापेक्षा शिवसेना काय करू शकते? शिवसेनेने संजय पवार यांना मराठा महासंघाचे कार्यकर्ते म्हणून उमेदवारी दिली, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा: 'चंद्रकांत पाटील साहेब जेवणाचे आमंत्रण देते, सहकुटुंब अवश्य या'
Web Title: Sanjay Raut Sanjay Pawar Application For Rajya Sabha 2022 As Candidate
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..