रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांबद्दल उद्धव ठाकरे गप्प का? सोमय्यांचा सवाल

सोमय्यांकडून रश्मी ठाकरे, संजय राऊत यांच्यावर घणाघात.
 Kirit Somaiya
Kirit Somaiyaटिम ई सकाळ

किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत काही कागदपत्र सादर केले आणि संजय राऊत, रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. मालमत्ता खरेदीप्रकरणात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात त्यांनी काही नवे खुलासे करण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांनी आरोप फेटाळल्यानंतर सोमय्यांनी पुन्हा काही कागदपत्र सादर केल्यामुळे आता या प्रकरणाची गुंतागुंत वाढत जातेय. संजय राऊतांच्या तोंडी उद्धव ठाकरेंची भाषा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

 Kirit Somaiya
'तेलंगणा शिवसेना भाऊ-भाऊ अन्...', नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

कोर्लई गावातील 19 बंगल्यांवर उद्धव ठाकरे काहीच का बोलत नाही? शिवसेनेच्या कोणत्याच नेत्यामध्ये या प्रकरणावर बोलण्याची हिंमत नाही असं सोमय्या म्हणाले. तसंच राऊतांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर देखील त्यांनी संताप व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ त्यांना कळतो का? ते उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या मार्फत ही शिवीगाळ करत असल्याचा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला.

 Kirit Somaiya
'50 वर्षांच्या सत्तेत राष्ट्रवादीनं काय केलं? आम्ही 5 वर्षांचा हिशेब मांडू'

कोविड घोटाळ्यामध्ये जी कंपनी ब्लॅकलीस्ट केली, ती लाईफ लाईन मॅनेजमेंट कंपनी. १५ दिवसांत ब्लॅकलीस्ट करण्यात आलं. या १५ दिवसांत ज्या लोकांचे जीव गेले, त्याला जबाबदार कोण असं सोमय्या म्हणाले. इंटरनल हेल्थ केअर ही कंपनी देखील अशीच असल्याचा आरोप सोमय्यांनी केला. या कंपन्यांना काम दिलं आणि एम.डी.च्या जागेवर कंपाऊंडर उभे केले अन् लोकांचे जीव गेले असं सोमय्या म्हणाले.

 Kirit Somaiya
चित्रा वाघ यांचा सेनेच्या नेत्याला टोला? 'गधे को दिया मान…'

किरीट सोमय्यांवर ते आरोप करतात, मात्र त्याबद्दलचे कागद दाखवत नाहीत असं म्हणत सोमय्यांनी राऊतांना टोला लगावला. राऊत म्हणतात माझ्या मुलीच्या लग्नातील मंडप डेकोरेटर्सला, फुलवाल्यांना धमकावलं. मात्र संजय राऊत मस्करी करतात का? असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला.

आपण कोणतेही गैरव्यवहार केले नसून, जी संपत्ती आहे ती सर्व निवडणूक आयोगासमोर सादर केली असल्याचं सोमय्या म्हणाले. आपल्या कोणत्याही संपत्तीमागे घोटाळा नसून, त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत असं सोमय्या म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com