
Sanjay Raut: 'ते भाषण तर शीतल म्हात्रेंचं होतं' ; 'त्या' विधानावर संजय राऊतांचा खुलासा
संजय राऊत यांच्या धमक्यांमुळे परराज्यात जावं लागलं, असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगात दाखल केलेल्या लेखी उत्तरात केला आहे. शिंदे गटाच्या दाव्या नंतर “लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा' हे विधान सध्या चर्चेत आलं आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Sanjay Raut Shinde Group sheetal mhatre speech Election Commission )
बंड करून गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दंडुक्यांनी मारणम्याची भाषा आपण केलीच नव्हती, असं राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. “लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा असं भाषण मला वाटतं आज त्यांच्या गटात असणाऱ्या शीतल म्हात्रे यांनीच अलिबागच्या सभेत केलं होतं. असा खुलासा राऊत यांनी आज केला.
भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ
ते भाषण म्हात्रेंच
नेमके ते का सोडून गेले? मी धमक्या दिल्यामुळे सोडून गेले की शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससह युती केल्यामुळे सोडून गेले की हिंदुत्वाच्या संदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या म्हणून ते सोडून गेले. त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे. ते प्रत्येक वेळा भूमिका बदलतात. असं खोचक टोमणा राऊत यांनी मारला.
ते खोके मिळाल्यामुळे सोडून गेले. हा धमकीचा विषय आत्ता आलाय. ते ज्या माझ्या भाषणाचा उल्लेख करतायत, ते भाषण मी हे लोक सुरतवरून गुवाहाटीला पोहोचल्यानंतर दहिसरला केलेलं आहे. ते भाषण काळजीपूर्वक पाहा तुम्ही. म्हणजे कळेल त्यांना मी काय बोललोय ते.
यांना आल्यावर दंडुक्यांनी बडवा, यांचा पार्श्वभाग सुजवा आल्यावर असं त्यांच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीच शिवसेनेत असताना केलेलं भाष्य आहे. त्यानंतर त्या गुवाहाटीला जाऊन त्यांना मिळाल्या. हे यांचं वैफल्य आहे. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय अशी प्रत्येक लढाई ते हरणार आहेत”, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.