
'माकडांच्या हाती दारूची बाटली आल्यावर जे...', निकालानंतर सेनेचा टोला
पाच राज्यांच्या निकालानंतर सगळीकडे शिवसेनेचा सुपडा साफ झाल्याचं समोर आलंय. भाजपने त्यांच्या हातातील चारही राज्यात नव्याने दम भरला. तर, यंदा आम आदमी पार्टीनेही डंका वाजवला. शिवसेना आणि राष्ट्रवादीला या निवडणुकीत सपशेल माघार घ्यावी लागल्याचं चित्र आहे. यानंतर सामना या सेनेच्या मुखपत्रातून 'विजयाचं अजीर्ण होऊ नये', असा टोला लगावण्यात आलाय. (Shivsena Taunts BJP over Assmebly Election 2022)
हेही वाचा: 'आमच्याकडे 'नोटा' कमी असल्याने...', गोव्यात डिपॉझिट जप्त झाल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया
'माकडाच्या हाती दारूची बाटली आल्यावर जे...'
निवडणूक कोणतीही असो, त्या निवडणुकीत संपूर्ण साधनसंपत्ती, प्रचार यंत्रणा, पैसा अशा आयुधांचा वापर करून भाजप ताकदीने उतरत असतो. देशासमोर इतर प्रश्न कोणते आहेत याची फिकीर न करता पंतप्रधानांपासून गृहमंत्री व संपूर्ण केंद्रीय व राज्यांचे मंत्रिमंडळ झोकून देऊन मैदानात उतरत असते. पाचही राज्यांच्या प्रचार काळात याचा प्रत्यय आलाच. पंजाबातील निकाल डोळ्यात अंजन घालणारे आहेत. उत्तर प्रदेशातील जमिनीवर अखिलेश यादवांना हवेत तीर मारून चालणार नाही. अधिक गांभीर्याने त्यांना यापुढे निवडणूक लढवावी लागेल. प्रियंका गांधींनी आता कुठे लढाईला सुरुवात केली आहे. ती त्यांनी अर्धवट सोडू नये. पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? माकडांच्या हाती दारूची बाटली आल्यावर जे घडते तसेच काहीतरी होईल. पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण असते. भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये!
Web Title: Sanjay Raut Slams Bjp In Saamana Over Assembly Election 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..