Sanjay Raut, Ajit Pawar I राऊत-पवार आपापसात भिडले, म्हणाले तिकीट देण्याचा अधिकार कुणाला..? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

संजय राऊतांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावण्यास सुरूवात

राऊत-पवार आपापसात भिडले, म्हणाले तिकीट देण्याचा अधिकार कुणाला..?

सध्या अनेक मुद्द्यांवरून राज्याचे राजकारण तापलं आहे. राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असून आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांसंदर्भातील ही बातमी असून यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपापसातच भिडले आहेत. दरम्यान, सध्या शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) खासदार आहेत. शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी (NCP) हे महाविकास आघाडीचे घटकपक्ष असताना शिरूरमध्ये पुढच्या वेळी शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) हे खासदार होतील, असं मोठं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं.

शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) घटकपक्ष असताना संजय राऊतांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावण्यास सुरूवात झाली आहे. आघाडी सरकार चालवताना काही तडजोडी कराव्या लागतात त्यामुळे काळजी करू नका मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष तुमच्या नेत्याच्या पाठीशी आहे आढळराव पाटील पुढील वेळी संसदेत असतील. राऊतांच्या या वक्तव्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राऊतांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: चंद्रकांत खैरेंचा नवनीत राणांना दम, म्हणाले मुख्यमंत्र्यांबद्दल वाईट...

राऊतांच्या विधानावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, खासदार संजय राऊतांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बरं वाटण्यासाठी हे वक्तव्य केलं असावं. उद्या मी पण जिथं शिवसेनेचा खासदार आहे तिथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून उमेदवार जाहीर करेल, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. दरम्यान, उमेदवार जाहीर केल्यावर मला तिकीट देण्याचा अधिकार आहे की शरद पवारांना (Sharad Pawar) आहे? संजय राऊत यांना तिकीट देण्याचा अधिकार आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आहे?, असा सवालही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीत देवदत्त निकम यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची धुरा यशस्वी सांभाळली होती, यावेळी आढळराव पाटील यांचा झालेला पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. राज्यात जरी महाविकास आघाडी असली तरी शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व शिवसेनेचे अद्याप मनोमिलन झालेले नाही. या दोन्ही पक्षात अनेकदा संघर्ष झालेला पाहावयास मिळत आहे. एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले देवदत्त निकम (Devdutt Nikam)अन् शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) एकत्र आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पारगाव परिसरात चर्चांना उधाणं आलं आहे.

हेही वाचा: 'मनसेला महाराष्ट्र दिसतो पण भाजपशासित कर्नाटक दिसत नाही का?'

Web Title: Sanjay Raut Statement On Ajit Pawar Reaction Shivaji Adhalrao Patil Is Shivsena Mp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top