मनसेला महाराष्ट्र दिसतो पण भाजपशासित कर्नाटक दिसत नाही का?, हनुमान चालीसावरून सावंतांचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

'मनसे व भाजपा महाराष्ट्र बदनाम करत आहेत हे स्पष्ट आहे'

'मनसेला महाराष्ट्र दिसतो पण भाजपशासित कर्नाटक दिसत नाही का?'

सध्या राज्यात मशिदीवरील भोंगे उतरवणे आणि हनुमाना चालीसा यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मागील काही दिवसांपासून भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही ठाकरेंवर झाला आहे. मात्र भोंगे हा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याचं मनसेने स्पष्ट केलं आहे. यानंतर राज ठाकरेंनी भोंग्यावरून उत्तर प्रदेश मधील योगी सरकारचे कौतुक केल्यानंतर राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं. आता पुन्हा एकदा भोंग्यांच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी मनसे आणि भाजपला टोला लगावला आहे. सावंत यांनी एक ट्विट करत नवा मुद्दा उपस्थित केला आहे.

हेही वाचा: तुम्ही राजीनामा द्या, आमदार राष्ट्रवादीचा करु; सेना नेत्याला टोला

सध्या महाराष्ट्राशेजारी कर्नाटकातही हनुमान चालीसाच वाद रंगला आहे. आजपासून कर्नाटकमधील एक हजार मंदिरांमध्ये पहाटे पाच वाजता लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसा, ओंकार किंवा भक्तीगीते लावण्यात येतील असा इशारा श्रीराम सेनेने दिला आहे. यावरून आता कर्नाटकचेही राजकीय वातावरण ढवळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरुन सावंत ट्विटमध्ये म्हणतात, केवळ मनसेला महाराष्ट्र दिसतो पण भाजपा शासित शेजारचा कर्नाटक का दिसत नाही? श्रीराम सेनेसोबत मनसेने तेथील आंदोलनात सहभागी व्हावे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंची हातभर का पायभर फाटली तेही स्पष्ट करावे. मनसे व भाजपा महाराष्ट्र बदनाम करत आहेत हे स्पष्ट आहे, असे म्हणत त्यांनी भाजप आणि मनसेला धारेवर धरलं आहे.

दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानंतर नवी मुंबईतील मनसैनिक आक्रमक झाले. त्यानंतर राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेतली. त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. ऐरोली परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका मशिदीसमोर जमत हनुमान चालीसा पठण केले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. औरंगाबादेत (Aurangabad) भोंग्यावर ठाम राहत त्यांनी राज्य सरकारला (State Government) अल्टीमेटम दिला होता. राज ठाकरे भाजपच्या इशारावर चालत असून भाजपचे राज्यात सरकार होते पण त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही, अशी टीकाही राज ठाकरे यांच्यावर करण्यात आली.

हेही वाचा: 'हिटलरसारखं काम कोण करतात हे भाजपला चांगलंच माहितीये'

Web Title: Congress Sachin Sawant Criticize To Mms On Hanuman Chalisa Pathan Karnataka Also

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top