Sanjay Raut: नेहरूंची बाजू घ्यायला राऊत सरसावले, "नाहीतर या हिंदुस्थानचा पाकिस्तान.." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay raut

Sanjay Raut: नेहरूंची बाजू घ्यायला राऊत सरसावले, "नाहीतर या हिंदुस्थानचा पाकिस्तान.."

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. राहुल गांधी यांच्या या व्यक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही नाराजी व्यक्त केली. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बोलताना आम्ही त्यांच्या व्यक्तव्याशी सहमत नसल्याचंही सांगितलं. तर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत ठाकरे गट जात असल्याची टीका भाजप आणि शिंदे गटाने केली आहे.

विनायक सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी थेट पंडित नेहरू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "एका बाईसाठी पंडित नेहरूंनी देशाची फाळणी केला होती, पंडित नेहरूंना हनीट्रॅपमध्ये अडकवून देशाची फाळणी केला, १२ वर्षे नेहरू भारताची गुप्त माहिती ब्रिटीश सरकारला देत होते" यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी रणजित सावरकर यांनाही लक्ष केलं आहे.

दरम्यान याबाबत बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकर आमच्यासाठी कायमच वंदनीय आहेत. त्याचबरोबर सावरकरांप्रमाणे, गांधी,नेताजी बोस, नेहरू ही सर्वच वंदनीय आहेत. कोणी सावरकरांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले म्हणून पंडित नेहरूवर प्रश्न निर्माण करायचे हे निदान स्वता:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी हे थांबवायला हवं, ही आपली परंपरा नाही असंही संजय राऊत बोलताना म्हणालेत.

हेही वाचा: Aaditya Thackeray: आधी गळ्यात गळे अन् आता विरोधी सूर..; राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आम्ही सगळे सावरकरांचे भक्त आहोत. आम्ही सगळे सावरकरांसाठी लढाई करतो. पण या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात आणि स्वातंत्र्यानंतर देश घडवणं. देश विकासाच्या वाटेवरून पुढे नेण्यास, विज्ञानाच्या दिशेने नेण्यास पंडित नेहरू यांचं मोठं योगदान आहे. जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते असं आपण म्हणतो तर त्या विज्ञाननिष्ठतेच्या दिशेने देश नेण्याचं काम पंडित नेहरू यांनी केलं आहे. नाहीतर या हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. आज जी पाकिस्तानची एक धर्मांध राष्ट्र म्हणून आज जी अवस्था आहे. तशी अवस्था आपली नेहरूंनी होऊ दिली नाही. यासाठी देश नेहरूंचा ऋणी आहे असंही राऊत बोलताना म्हणालेत. स्वातंत्र्यानंतर देश घडवण्यात नेहरूंच मोठं योगदान आहे. नेहरू नसते तर आपल्या देशाचा पाकिस्तान झाला असता असंही राऊत म्हणालेत.