Sanjay Raut urges a formal alliance between Uddhav and Raj Thackeray : हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही. ती युती होणे गरजेचे आहे. त्यात आता संभ्रम नको, असं म्हणत संजय राऊत यांनी मनसेला साद घातली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील रोखठोक या सदरातून त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं. त्यामुळे आता विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.