Sanjay Raut: हे आम्ही त्यांना सांगायला नको.. मोदी-पवार भेटीवर ठाकरे गटाच्या नेत्याची रोखठोक प्रतिक्रिया

Sanjay Raut on Pawar-Modi meet:..अशा भेटींमुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो, पवार-मोटी भेटीवर संजय राऊतांचं परखड मत.
Sanjay Raut: हे आम्ही त्यांना सांगायला नको.. मोदी-पवार भेटीवर ठाकरे गटाच्या नेत्याची रोखठोक प्रतिक्रिया

Sanjay Raut on PM visit:पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (दि.१ ऑगस्ट) पुण्यात येणार आहेत. यावेळी शरद पवार देखील त्यांच्यासोबत एकाच मंचावर असणार आहेत. शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर असल्याने अनेक संभ्रम निर्माण होत आहेत. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना माध्यंमांकडून प्रश्न विचारण्यात आले होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले की पवार आणि मोदींच्या भेटीमुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम आम्ही त्यांना सांगायला नको. जेव्हा महाविकास आघाडी किंवा इंडिया घटकातील नेते जेव्हा अशा ठिकाणी जातात तेव्हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.

पंतप्रधान नरेंद् मोदी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरद पवार एकाच व्यासपीठावर असणार आहेत. इंडिया युतीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस हा प्रमुख घटकपक्ष आहे. यावेळी संजय राऊत यांनी आपले मत मांडले, "आम्ही काही पवार साहेबांना सल्ला देणार नाही. पण मी पाहतोय, ऐकतोय, वाचतोय लोक अस्वस्थ आहेत. लोकांच्या मनात जो असंतोष आहे, तो स्पष्ट खदखदताना दिसतोय."

यापुढे राऊत म्हणाले की," ज्या प्रकारचं राजकारण काही दिवसांमध्ये , वर्षांमध्ये या देशात आणि राज्यात चालूये. ते काही लोकांना मान्य नाही आणि त्याचे जे करते धर्ते असतात , त्यांना कोणता पुरस्कार हवाय , नोबेल पुरस्कार हवाय, हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्याबद्दल काही भूमिका घेणार नाही. महाविकास आघाडी किंवा इंडिया या घटकातील नेते अशा ठिकाणी जातात, तेव्हा लोकांच्या मनात संभ्रम होतो. शरद पवार इतके अनुभवी नेते आहेत की त्यांना हा संभ्रम आम्ही सांगायला नको."

Sanjay Raut: हे आम्ही त्यांना सांगायला नको.. मोदी-पवार भेटीवर ठाकरे गटाच्या नेत्याची रोखठोक प्रतिक्रिया
Swanandi Tikekar: आशिषबद्दल स्वानंदीच्या पप्पांना विचारला तो प्रश्न, ते म्हणाले... आम्ही शेरलॉक होम्स

संजय राऊत यांनी यावेळी लोकमान्य टिळकांचाही संदर्भ दिला. यावेळी त्यांनी या लोकांचं स्वातंत्र्य चिरडणारं सरकार आहे, अशी टीका केली. यावेळी ते म्हणाले की, "भारतीय असंतोषाचे जनक म्हणतो. ब्रिटीशांविरुद्ध गुलामगिरी विरुद्ध असंतोषाची ठिणगी टाकण्याचं काम जर कुणी केलं असेल, ते पुण्यातू झालं आणि लोकमान्यांनी केलं.लोकमान्यांनी फार मोठी जागृती केली. लोकमान्यांनी गुलामगिरीच्या बेड्या तोड्याव्यात यासाठी केसरी हे वृत्तपत्र काढलं आणि ते वृत्तपत्राचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी ब्रिटीशांनी जंग-जंग पछाडलं."

यापुढे राऊत म्हणाले की," आजही देश त्याचं वातावरणातून जातोय.स्वातंत्र्य नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आणि माध्यम स्वातंत्र्य नाही. हे चिरडणारं सरकार या देशामध्ये आहे आणि त्याविरुद्ध इंडिया हे संघटन उभं राहिलंय. त्यातले शरद पवार हे माननीय आणि महत्वाचे घटक आहे. उद्या आम्ही हे टिळकांचे गुण , टिळकांनी जो मार्ग दाखवला त्याचं स्मरण आम्ही करु. मला वाटतं पवार साहेब सुद्धा टिळकांच्या याचं भुमिकेचं स्वागत आणि स्मरण करतील. "

Sanjay Raut: हे आम्ही त्यांना सांगायला नको.. मोदी-पवार भेटीवर ठाकरे गटाच्या नेत्याची रोखठोक प्रतिक्रिया
लालू यादव कुटुंबाच्या कोट्यवधीच्या संपत्तीवर जप्ती; 'जमिनीच्या मोबदल्यात नोकरी' प्रकरणी कारवाई

शेवटी बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीबद्दल आणि इंडिया युतीबद्दल वक्तव्य केलं. ते म्हणाले की,"हा संभ्रम त्यांच्या विषयी आहे. आमच्या विषयी नाही. पण आम्ही एक आहोत. महाविकास आघाडी घट्ट आहे. आणि इंडिया त्याहून घट्ट आहे."

Sanjay Raut: हे आम्ही त्यांना सांगायला नको.. मोदी-पवार भेटीवर ठाकरे गटाच्या नेत्याची रोखठोक प्रतिक्रिया
Sambhaji Bhide Controversy : संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्याला एक लाखाच्या बक्षिसाची घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com