Swanandi Tikekar Father uday tikekar talk about    Swanandi Ashish Kulkarni wedding relation when they knows
Swanandi Tikekar Father uday tikekar talk about Swanandi Ashish Kulkarni wedding relation when they knowsSAKAL

Swanandi Tikekar: आशिषबद्दल स्वानंदीच्या पप्पांना विचारला तो प्रश्न, ते म्हणाले... आम्ही शेरलॉक होम्स

स्वानंदीच्या लग्नाबद्दल जेव्हा कळलं तेव्हा बाप म्हणुन काय भावना होती याचा खुलासा स्वानंदीने केलाय.

Swanandi Tikekar Wedding News: स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांनी काही दिवसांपुर्वी साखरपुडा केला. स्वानंदी आणि आशिष यांचे साखरपुड्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले. या दोघांचे रोमॅंटीक अंदाजातले फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले.

अशातच स्वानंदीचे बाबा आणि प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर यांनी एका मुलाखतीत स्वानंदीच्या लग्नाबद्दल बाप म्हणुन त्यांचं मत व्यक्त केलंय. स्वानंदीच्या लग्नाबद्दल जेव्हा कळलं तेव्हा बाप म्हणुन काय भावना होती याचा खुलासा स्वानंदीने केलाय.

(Swanandi Tikekar Father uday tikekar talk about swanandi Ashish Kulkarni wedding)

Swanandi Tikekar Father uday tikekar talk about    Swanandi Ashish Kulkarni wedding relation when they knows
Zinda Banda Jawan: सळसळती ऊर्जा, कडक डान्स.. शाहरुखच्या जवानचं पहिलं गाणं जिंदा - बंदा

आम्ही म्हणजे शेरलॉक होम्स नाही

स्वानंदीने जेव्हा पहिल्यांदा घरी आशिष आवडतो असं सांगितलं, तेव्हा वडील म्हणुन आशिष बद्दल माहिती काढली का? असा प्रश्न विचारल्यावर उदय टिकेकर म्हणाले, “मी, स्वानंदी आणि आरती आमच्या तिघांमध्ये कोणत्याही गोष्टी अशा लपल्या नसतात. त्यामुळे स्वानंदीच्या बॉयफ्रेंडची माहिती काढायची, किंवा माझा होणारा जावई काय करतो अशी शेरलॉक होम्सगिरी करायची काही गरज नव्हती.

उदय टिकेकर पुढे म्हणाले, "मला स्वतःला आशिष कुलकर्णी कोण हे माहीत नव्हतं. त्यामुळे मी, आरती, माझ्या सासुबाई म्हणजेच आरतीची आई आम्ही एका रात्रीत त्याची ‘इंडियन आयडॉल’मधील सर्व गाणी ऐकली. गाणी ऐकल्यानंतर वाटलं की वाह! पोरगा मस्त गातो”

माझे अर्धे नातेवाईक नवऱ्याकडून आहेत

याशिवाय पुढे उदय टिकेकर त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना होणारा जावई आशिषबद्दल सांगितलं तेव्हा ते म्हणाले, “जेव्हा मी माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना आशिषबद्दल सांगितलं, तेव्हा सगळे मित्र आणि नातेवाईक आशिषचे चाहते निघाले.

उदय टिकेकर यांनी पुढे एका नातेवाईकाची रिअॅक्शन सांगीतली.. "मदन कुलकर्णी नावाचा माझा साडू आहे. तो कर्नाटकमध्ये असतो. त्याला जेव्हा कळलं तेव्हा तो स्वानंदीला म्हणाला, ‘मी तुझ्या पार्टीत नाही. मी कुलकर्णी आहे, लग्नात मी मुलाकडून असेन’.

असे मला कितीतरी लोक भेटलेत जे पहिल्या एपिसोडपासून त्याला फॉलो करतात, त्याच्यावर प्रेम करतात. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात पण नंतर कळतात,” असं उदय टिकेकर लोकमतशी बोलताना म्हणाले.

स्वानंदी आणि आशिष लग्न कधी करणार?

येत्या डिसेंबरमध्ये स्वानंदी व आशिष हे लग्न बंधणात अडकणार आहे , त्याचे लग्न पुण्यातच होईल. स्वानंदी आणि आशिष या दोघांचे कुटुंबही पुण्याचेच आहे. त्यामुळे लग्नासाठी पुणे हेच उत्तम ठिकाण असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुलीचं लग्न हे सगळ्या पालकांचे स्वप्न असते. तसचं काहीस उदय टिकेकर यांचही असेल. आता मुलीचं लग्न होणार या विचाराने उदय टिकेकर थोडे भावुक होत असले तरी स्वानंदी लग्न करून गेल्यावर तेव्हा ते भावुक होणार नाहीत असं ते म्हणाले.

उदय टीकेकर यांच्या म्हणण्यानुसार आता स्वानंदी आणि आशिष हे डिसेंबर पुण्यात लग्न बंधनात अडकणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com