“पीठ से निकले.. खंजरों को गिना जब, ठीक उतनेही थे.. जित्नोंको गले लगाया था..!” | Sanjay Raut tweet on rebel MLA | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray And Balasaheb Thackeray

“पीठ से निकले.. खंजरों को गिना जब, ठीक उतनेही थे.. जित्नोंको गले लगाया था..!”

मुंबई – शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर आता खासदारही फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेनेचे १२ खासदार भाजपच्या बाजुने जाण्याची शक्यता असताना उद्धव ठाकरे यांनी आपला ठाकरी बाणा दाखवत बंडखोरांसह भाजपला कडक शब्दात ठणकावलं आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी ट्विट करून बंडखोरांवर टीका केली. (Sanjay Raut tweet News in Marathi)

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये एक शेअर केला. या ट्विटचा रोख दगा फटका करून बंडखोरी करणाऱ्या आमदारांकडे होता. ट्विटमध्ये ते म्हणाले की, पीठ से निकले.. खंजरों को गिना जब, ठीक उतनेही थे.. जित्नोंको गले लगाया था..! संजय राऊत यांनी ट्विटमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे.

संजय राऊत सातत्याने बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. तर बंडखोर गटाकडून देखील सातत्याने संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात येते.

Web Title: Sanjay Raut Tweet On Rebel Mla

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..