राजाच्या नादी लागू नका, तुमचा बाजा वाजवणार : राऊत

Sanjay-Raut on maharashtra nagarpanchayat election result
Sanjay-Raut on maharashtra nagarpanchayat election resulteSakal

मुंबई : राज्यात आज १०६ नगरपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. आतापर्यंत एकूण ९७ नगरपंचायतींचे निकाल (Maharashtra Nagarpanchayat Election Result) हाती आले असून राष्ट्रवादीला सर्वाधिक नगरपंचायत मिळाल्याचे दिसतेय. याच निकालावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) विरोधी पक्ष भाजपला इशारा दिला आहे.

Sanjay-Raut on maharashtra nagarpanchayat election result
बुलडाणा : बच्चू कडूंची जोरदार एन्ट्री', भाजपच्या माजी मंत्र्यांवर 'प्रहार'

राज्यात महाविकास आघाडीची घौडदौड आहे. भाजपने काही दावे केले होते. मात्र, ते फोल ठरले आहेत. त्यांना त्यांच्या दाव्यांमध्ये आनंद मानायचा असेल तर मला हरकत नाही. पण, भाजपला अनेक वर्ष विरोधात राहावे लागेल, असे राज्यातील नगरपंचायतीचे निकाल आहेत. तसेच राजाच्या नादाला लागू नका. राजा तुमचा बाजा वाजवल्याशिवाय राहणार नाही. मतदार हा राजा आहे आणि तो तुमचा बाजा वाजवेल, असा इशारा संजय राऊतांनी भाजपला दिला आहे.

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती, भंडारा-गोंदिया या दोन जिल्हा परिषदांमध्ये ६१३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीतून महाविकास आघाडी की भाजप कोणता पक्ष मोठा असेल याचा अंदाज येणार होता. आतापर्यंत १०६ नगरपंचायतीपैकी ९७ नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीला २५ नगरपंचायती मिळाल्या असून भाजपला २४ नगरपंचायती मिळाल्या आहेत. काँग्रेसने १८ नगरपंचायतीवर वर्चस्व मिळविले असून शिवसेनेला १४ नगरपंचायती मिळाल्या आहेत. म्हणजेच महाविकास आघाडीला एकूण ५७ नगरपंचायती मिळाल्या आहेत, तर भाजपला २४ नगरपंचायती मिळाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com