Maharashtra Politics: दानवेंच्या मुलाचा साखरपुडा शिरसाटांचा गोडवा, कट्टर विरोधकांच्या त्या फोटोमुळे भुवया उंचावल्या

शिरसाट अन् दानवेंच्या त्या फोटोमुळे नेत्यांच्या भुवया उंचावल्या
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal

शिवसेनेत दुफळी पडल्यापासून ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यात अनेकदा शाब्दीक चकमक पहायला मिळते. मात्र सध्याच्या राजकारणात कोण कुणाचा शत्रू आणि कोण कुणाचा मित्र हेच नागरिकांना समजत नाही. तसाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये पहायला मिळाला.

शिवसेनेत पडेलेल्या फुटीनंतर एकमेकांना पाण्यात पाहणारे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे व संजय शिरसाट रविवारी एकाच मंचावर पहायला मिळाले. निमित्त होतं ते अंबादास दानवेंच्या मुलाच्या साखरपुड्याचं दोघंही या निमित्ताने एकत्र मंचावर होते. एरवी एकमेंकांवर बोट दाखवणारे एकमेकांचे प्रतिस्पर्धी रविवारी मात्र एकमेकांना हास्तांदोलन करताना पाहिले. शिरसाट यांच्या या सोहळ्याच्या उपस्थितीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Maharashtra Politics
Weather Update: प्रतीक्षा वाढली! राज्यात पावसाची पुन्हा हुलकावणी; सप्टेंबरमध्ये पावसाची आशा

मंत्रीपदापासून लांब असलेले संजय शिरसाट हे सत्तेत असले तरी नाराज असल्याचीही जोरदार चर्चा आहे. तर मागील काही वर्षांचा राजकारणातील घडामोडी पाहता. विरोधीपक्ष नेते हे कालांतराने सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचाही इतिहास आहे. त्यामुळे दोघांच्या या शुभकार्यातल्या भेटीने उलट सुलट चर्चा सध्या संभाजीनगरमध्ये रंगू लागल्या आहेत.

Maharashtra Politics
Mumbai News: मुंबईत १८ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या; घटनेने परिसरात खळबळ

तर शिवसेनेत बंड झाल्यानंतर अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवरून शिवसेनेतील काही नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत तर त्यामध्ये संजय शिरसाट यांच्याही नावांची जोरदार चर्चा आहे. अशातच या नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Maharashtra Politics
Devendra Fadanvis उपमुख्यमंत्री 5 दिवसांसाठी जपान दौऱ्यावर रवाना, मिळणार शासकीय अतिथीचा विशेष दर्जा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com