
Shiv sena: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये ते बेडवर बसलेले असून हातामध्ये काहीतरी आहे. बेडच्या खाली पैशांनी भरलेली एक सुटकेस दिसत आहे. या व्हिडीओवर संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 'सकाळ' या व्हिडीओची पुष्टी करीत नाही.
संजय राऊत यांनी या व्हिडीओशी संबंधित दावा केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ समोर आलेला आहे. पैशांच्या बॅगेसह संजय शिरसाट असल्याचा दावा त्यांनी केला होता. प्रसारमाध्यांच्या हाती व्हिडीओ लागलेला असून व्हिडीओने खळबळ उडाली आहे.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, संजय राऊतांनी ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब हे दिल्लीला गेले होते आणि मुख्यमंत्री करा, असं ते म्हणाले. हे मुर्खासारखं स्टेटमेंट करणं त्यांनाच जमू शकतं. सकाळी उठलं की एकनाथ शिंदे, दुपारी उठलं की एकनाथ शिंदे,संध्याकाळी एकनाथ शिंदे.. त्यांची दाढी, त्यांचा करिष्मा.. याला ते टार्गेट करतात.