Sant Gadge Baba Birth Anniversary : गाडगेबाबा पंढरपूर मंदिरात जायचे नाहीत... कारण वाचाल तर...

संत गाडगे बाबां यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेणगाव या गावी झाला.
Sant Gadge Baba Birth Anniversary
Sant Gadge Baba Birth Anniversary sakal

“जे का रंजले गांजले ।

त्यासी म्हणे जो आपुले ॥

तोचि साधू ओळखावा ।

देव तेथेचि जाणावा ॥"

या संत तुकारामाच्या अभंगाच्या ओळी वाचल्या की एक नाव समोर येतं ते म्हणजे संत गाडगेबाबा. संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेणगाव या गावी झाला. त्यावेळी महाराष्ट्राच अज्ञान, अंद्धश्रद्धा, अत्याचाराचे डोंगर उभे होते.

वडिलांचे नाव झिंगराजी आणि आईचे नाव सखूबाई होते तर आडनाव जाणोरकार होते. तर त्यांना सर्व डेबूजी म्हणत. ते नेहमी अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा वेश करत असल्यामुळे लोक त्यांना ‘ गोधडे महाराज ’ किंवा  ‘ गाडगे महाराज ’ म्हणूनच ओळखत असत. (Sant Gadge Baba Birth Anniversary)

Sant Gadge Baba Birth Anniversary
Gadgebaba Death Anniversary : गाडगेबाबांच्या भेटीनंतर खुद्द बाबासाहेबांच्या डोळ्यांत उभे राहिले अश्रू

१९१२ मध्ये त्यांचा विवाह कुंताबाईशी विवाह झाला पण समाज सेवेची गोडी असल्यामुळे त्यांचे कधीच संसारात त्यांचे मन रमले नाही. पुढे काही वर्षांनी ते घरदार सोडून तिर्थयात्रा करू लागले. समाजातील अज्ञान, चुकीच्या चालीरीती, रुढी परंपरा व अंधश्रद्धा दूर करण्याचे त्यांनी ठरविले. पुढे गाडगेबाबा गावोगावी फिरू लागले.

ज्या गावात संत गाडगेबाबा जात, ते गाव हाताती खराट्याने स्वच्छ करत व संध्याकाळी गावातील लोकांच्या मनातील घाण किर्तनाच्या माध्यमातुन स्वच्छ करत अशा प्रकारे त्यांनी स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलत.

एवढंच काय तर महाराष्ट्र व्यतिरिक्त  गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगावी कीर्तने करून लोकजागृती केली. 

Sant Gadge Baba Birth Anniversary
Gadgebaba Death Anniversary : माझा कोणीही शिष्य नाही म्हणणारे गाडगेबाबा या संताना मानायचे आपला गुरु

‘ चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये ’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून देत असत. स्वच्छता, प्रमाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे.

तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात; परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करी व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करी. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी- भाकरी मागून आणून खात.

Sant Gadge Baba Birth Anniversary
Sant Gadge Baba Birth Anniversary : निरक्षर असलेल्या गाडगे बाबांचे नाव कसे आले अमरावती विद्यापीठाला?

पंढरपूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी इ. ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी  लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवर घाटही बांधला. अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या. समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांनाही त्यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या.

असाच प्रवास करीत असता २० डिंसेंबर १९५६ अमरावतीजवळ त्यांचे अचानक निधन झाले. त्यांची समाधी अमरावती येथे आहे. आजही गाडगे महाराजांचे कार्य, त्यांचे विचार प्रत्येकांना प्रेरीत करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com