

मुंबईः कुठल्या ना कुठल्या कारणाने कायम चर्चेत असलेले शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आज पुन्हा प्रकाशझोतात आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी बांगर यांनी नवसाचा मोदक घेतला आहे.
गुरुवारी राज्यामध्ये सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह दिसून येत आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये मिरवणुका आणि पारंपारिक उत्सवाचं वातावरण आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणे आणि मुंबईत तुफान गर्दी झाली आहे.
दुसरीकडे हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांनी चिंतामणी गणपतीचे दर्शन घेऊन देवापुढे एक नवस केला आहे. चिंतामणी नवसाला पावतो, असा दावा बांगर यांनी केला आहे. त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी मोदक घेतला. २०२४ मध्येही एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावं, यासाठी नवस केल्याचं बांगर म्हणाले.
यावेळी माध्यमांशी बोलताना संतोष बांगर म्हणाले की, २०२४ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनाच संधी मिळावी, यासाठी मी मोदक घेतला आहे. २०१९ला मी आमदार होण्यासाठी मोदक घेतला होता. त्यावेळी माझी इच्छा पूर्ण झाली.
''या गणपतीला संकल्प सोडला तर तो नवस पूर्ण झाल्याशिवाय रहात नाही. देशात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच राहावेत आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं राज्य राहावं, यासाठी आपण साकडं घातलं आहे.'' असं संतोष बांगर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.