

Supriya Sule Meet Santosh Deshmukh Family: राज्यात बीडमधील सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट सांत्वन केले. देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग करु नये, त्यांचा लढा आता मी लढणार आहे असे आश्वासनही यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिले. बीडमधील गुंडागर्दी संपली पाहिजे. तानाजी सावंतांचा मुलगा सापडतो पण फरार कृष्णा आंधळे सापडत कसा सापडत नाही असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.