

Beed Latest News: संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांनी राजकारणात काम करताना जपलेला साधेपणा आणि परोपकारीपणाचे दर्शनही उभ्या महाराष्ट्राला झाले. तीन टर्म ग्रामपंचायत ताब्यात असूनही दिवंगत संतोष देशमुख स्वत:चे घर बांधू शकले नाहीत. मात्र, शिवसेना व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आता देशमुख कुटूंबियांना हक्काचे घर मिळणार आहे.