Anjali Damania PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पकडून देण्याचे खरे सूत्रधार धनंजय मुंडेच आहेत, असा मोठा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्यासह दहा आरोपींना सहआरोपी करावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी यासंदर्भातील आरोप केले. अंजली दमानिया यांच्या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.